शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यास कृती आराखडा - वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 08:12 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी हा कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

चंद्रपूर : जादूटोणा, भानामतीच्या संशयावरून चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या अमानुष घटनांमुळे राज्य सुन्न झाले. अशा घटना कशा रोखता येतील, यासाठी कृती आराखडा तयार केल्याची माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी हा कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालकमंत्री वडेट्टीवार या कृती आराखड्यावर शिक्कामोर्तब करणार आहेत. गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दलाच्या स्थापनेसह डोक्यातील भूत काढण्यासाठी प्रबोधनावर विशेष भर कृती आराखड्यात देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावात गावकऱ्यांनी आठजणांना खांबाला बांधून अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर नागभीड तालुक्यात दोन, चंद्रपूर आणि अलीकडेच चिमूर तालुक्यात अंगणवाडी केंद्रात पूजेचे लिंबू फेकण्याचा प्रकार घडला. अशा घटनांवर आळा घालण्याच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी कृती आराखड्यासाठी पुढाकार घेतला. 

असा आहे कृती आराखडाजादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यात सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, दलित प्रतिनिधी, मागासवर्गीयांचा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी असा सात ते आठ जणांचा समावेश असेल. या कृती दलाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची रूपरेषाही सादर केली आहे. ३० ते ३५ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारी मंडळी हे प्रशिक्षण देतील. नंतर हे कृती दल जिल्ह्यातील सर्व गावांत तयार करण्यात येईल. गावागावांत सामूहिक प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारState Governmentराज्य सरकार