शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

मुख्यालयी न राहणाऱ्या वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: October 14, 2015 01:33 IST

ग्राहकांना सेवा देणे आपले कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी,

चंद्रपूर : ग्राहकांना सेवा देणे आपले कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण, महापारेषणबाबत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आ. शोभाताई फडणवीस, आ. नाना शामकुळे, आ. डॉ. देवराव होळी, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, पंचायत समितींचे सभापती, महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर २०१५ पर्यंत सर्व थकबाकी वसूली करा, मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर प्रलंबित घरगुती, औद्योगिक व कृषी पंपाबाबत तातडीने कार्यवाही करून वीज उपलब्ध करून द्या, डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत महावितरणमधून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी तयार करून कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण देऊन त्या जागी आयटीआयच्या युवकांना संधी देण्यात यावी, अपघात झालेल्या ठिकाणी वीज निरीक्षकाने तातडीने जाऊन २४ तासात अहवाल सादर करावा तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला शासनाची मदत उपलब्ध करून द्यावी, त्यावेळेस संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना सोबत घ्यावे, महावितरणच्या खांबावर वीज जोडणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस अनुमती देण्यात येऊ नये तसेच असे करावयास भाग पाडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी, असे सांगितले.प्रत्येक उपअभियंत्याने संबंधित विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधीस महिन्याच्या शेवटी प्रगती अहवाल सादर करावा. तसेच ग्रामीण भागातील पंचायत समितीत होत असलेल्या सभापतींच्या मासिक बैठकीला उपस्थित राहावे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या ठिकाणी संबंधित लाईनमन, उपअभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नावासह संपर्क क्रमांकाचा दर्शनी भागात फलक लावावा, ग्रामपंचायतच्या ठिकाणी वीज देयक केंद्रस मान्यता देण्यात यावी, बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतचा परवाना देण्याबाबत त्यांच्यात जनजागृती करण्याच्या हेतूने मेळावे भरवावेत, त्यांच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य करावे, प्रत्येक तालुकास्तरावर रोहित्र भवनाची निर्मिती करावी आणि एका उपविभागामध्ये केवळ एकाच कंत्राटदाराला काम करण्याची परवानगी देऊन जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्राहक, शेतकऱ्यांना उत्तम सेवा द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.बैठकीत अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींसह सर्व आमदारांनी सूचना मांडल्या. (स्थानिक प्रतिनिधी)