शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

अतिक्रमणाच्या वादात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: March 26, 2015 00:52 IST

तालुक्यातील सुशी येथे माता मंदिरजवळ असलेल्या जागेबाबत मोजणी केल्यानंतर रितसर अतिक्रमण न काढता घाईघाईत अतिक्रमण काढल्याने दोन गटात ..

मूल : तालुक्यातील सुशी येथे माता मंदिरजवळ असलेल्या जागेबाबत मोजणी केल्यानंतर रितसर अतिक्रमण न काढता घाईघाईत अतिक्रमण काढल्याने दोन गटात वाद उफाळला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाले आहे. सुशी येथील माता मंदिराजवळ अशोक घडसे यांचे अतिक्रमण होते. जागेच्या मोजनी संदर्भात गावातील नागरिकांनी मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालय मूल येथे अर्ज केल्यानंतर मोजणीसाठी कर्मचारी आले. जागेची मोजणी केल्यानंतर अतिक्रमण आहे, हे सिद्ध झाले. मात्र अतिक्रमण काढण्यासंदर्भात परवानगी घेणे गरजेचे होते. मात्र काही नागरिकांनी घाई केल्याने मोजणी नंतरच अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाद उफाळला आणि दोन गटांत हाणामारी झाली.ही वार्ता गावात पसरताच एका समाजाच्या नागरिकांनी सदर प्रकरण उचलले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. मूल पोलीसांनी यासंदर्भात १५ जणांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ४२७ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. गावात तणावाचे वातावरण पसरल्याने दंगा नियंत्रण पथकाला गावात बोलाविण्यात आले. त्यामुळे तणाव शांत झाले. गावात पोलीस तैणात करण्यात आले असून पुढील तपास करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)