शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आरोग्य सेविकेचे आरोप तथ्यहीन

By admin | Updated: October 19, 2016 02:07 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सुप्रिया भगत हिने लावलेले सर्व आरोप खोटे असून

पत्रकार परिषद : आरोग्य सेविकेला निलंबित करण्याची मागणीगांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका सुप्रिया भगत हिने लावलेले सर्व आरोप खोटे असून आरोप सिद्ध न झाल्यास तिला नोकरीतून निलंबित करावे अशी मागणी आवळगाव येथील सरपंच ज्योती जनबंधू तसेच गावातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली आहे.आवळगाव येथील आरोग्यसेविका सुप्रिया भगत हिने आपल्यावर हल्ला तसेच विनयभंग करणे व जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी आवळगावच्या सरपंच ज्योती जनबंधू, त्याचे पती अश्वजित जनबंधू, नितीन कुळमेथे, बाळू नरूले, काशिनाथ वारजूरकर, रामदास उरकुडे, तसेच अन्य आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात सरपंच व संबंधित नागरिकांनी तसेच गावकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन लावण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले.ज्योती जनबंधू म्हणाल्या की, मी स्थानिक जि.प. सदस्या यांच्याकडे जावून संबंधित आरोग्य सेविकेच्या बदलीचा अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नावाने लिहिला. यावेळी मी एकटीच गेली होती. माझे पती अश्वजित जनबंधू तसेच इतर कोणीही माझ्यासोबत नव्हते. याबाबत ८ आॅक्टोबरला तालुका आरोग्य अधिकारी व मुडझा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रसूतीच्या चौकशीसाठी आले असता संबंधित आरोग्य सेविकेने विनयभंगासारखा प्रकार आपल्या वरिष्ठांना का कळविला नाही? ११ आॅक्टोबरला विनयभंग, जिवे मारण्याची धमकी अशी तक्रार दाखल केली. ती वैमनस्यातून असून तक्रारीत दाखल व्यक्तींचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यांनी आरोग्यसेविकेच्या बदली संदर्भातील अर्जावर सही केल्यामुळे त्यांना गोवण्यात आलेले आहे. व या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व आरोग्य सिद्ध न झाल्यास संबंधीत आरोग्य सेविकेला निलंबित करण्यात यावी अशी मागणी सरपंच ज्योती जनबंधू, अश्वजीत जनबंधू, रामदास भोयर, रामदास उरकुडे, सरिता भोयर, मंजुषा डवरे, उपसरपंच आशा भोयर, नीतेश कुळमेथे, काशीनाथ वारजूकर, विनोद मेश्राम, विनोद ठाकरे, विलास शेंडे, नंदू कुळमेथे यांनी केली आहे. (वार्ताहर)रस्त्यात महिलेची प्रसूतीआपण ३ आॅक्टोबरला विद्या विनोद मेश्राम ही महिला प्रसूतीकरिता दुपारी १ ते १.३० च्या सुमारास आवळगाव येथे गेली असता कर्तव्यावर असलेल्या सुप्रिया भगत यांनी जवळपास अर्धा तास स्वास्थ उपकेंद्राचे दार उघडले नाही. त्यामुळे आशा वर्कर मंजुषा डवरे यांनी मुडझा येथे अ‍ॅम्बुलन्स करिता फोन लावला असता वाहन चालकाने गाडी नादुरुस्त असल्याचे उत्तर दिले. विद्या मेश्राम यांना खासगी वाहनाने आरमोरीला नेत असताना चिचगावजवळ प्रसूती झाली. त्यानंतर पुन्हा विद्याला गावाकडे परत आणण्यात आले. त्यानंतर बाळाची नाळ कापण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात नेले असता आरोग्यसेविकेने कसलाही प्रतिसाद दिला नाही. या प्रकारामुळे चिडलेल्या नागरिकांनी सुप्रिया भगत यांच्या बदलीची तक्रार माझ्याकडे आणून दिली. मी सरपंच आणि ग्रामआरोग्य समितीची अध्यक्ष म्हणून संबंधीत आरोग्य सेविकेला विचारणा केली असता मी झोपेच्या गोळ्या खावून झोपली होती, असे आश्चर्यकारक उत्तर दिले.