शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस’ लिहिलेल्या चारचाकी वाहनाने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2022 05:00 IST

तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते.  परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दुर्गा मंगल कार्यालयाजवळ येताच  उभ्या चारचाकी हुंडाई (क्र.एम. एच. १२ पी. टी. ७४०६ ) च्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी दाराला धडकली. यात देवीदास लिंगायत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : रस्त्याच्या कडेला उभ्या चारचाकी चालकाने अचानक दार उघडल्याने मागून येणारी  दुचाकी धडकून झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुर्गा मंगल कार्यालयाजवळ घडली. देवीदास लिंगायत, रा. मांगली असे जखमीचे नाव आहे. सदर चारचाकी वाहनात ‘पोलीस’ लिहिलेली पाटी असल्याने घटनास्थळी चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी उशिरा घटनेची दखल घेत एफ.आय.आर. दाखल केला.तालुक्यातील दूधवाही येथे साळ्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटोपून ब्रह्मपुरी येथे येत असताना तक्रारकर्ता प्रकाश लोखंडे ब्रह्मपुरी हे परिवारासह परत येत होते.  परत येताना समोर सासरे (क्र. एम. एच. ३४ पी. २६३८ ) दुचाकीने येत होते. तर जावई प्रकाश मागे होते. दुर्गा मंगल कार्यालयाजवळ येताच  उभ्या चारचाकी हुंडाई (क्र.एम. एच. १२ पी. टी. ७४०६ ) च्या चालकाने अचानक दार उघडल्याने दुचाकी दाराला धडकली. यात देवीदास लिंगायत रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. 

‘पोलीस’ नावाची पाटी संशयास्पदबाहेर गावाहून ब्रह्मपुरी येथे आलेल्या चारचाकी वाहनात ‘पोलीस’ असे इंग्रजीत लिहिलेली पाटी समोरील काचाच्या आत ठेवण्यात आली होती. त्यामुळे हे वाहन पोलीस विभागाचे असेल असे नागरिकांना वाटले. मात्र, एम. एच. १२ सिरीज असलेल्या वाहनाची पासिंग पुणे येथील आहे. अपघात होताच चालकाने उपस्थितांशी अरेरावीची भाषा वापरून माझे वडील पी. एस. आय. असल्याचे सांगितले. सदर वाहनावरील पोलीस नावाची पाटी संशयास्पद असल्याचे दिसून आले. 

 

टॅग्स :Accidentअपघात