शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
3
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
4
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
5
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
6
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
7
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
8
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
9
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
10
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
11
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
12
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
13
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
14
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
15
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
16
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
17
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

सुंदरतेला अतिक्रमणाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 01:12 IST

चंद्रपूर शहर वरकरणी बरे दिसत असले तरी ते आतल्या आत दाटीवाटीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक

रस्ते आणखी अरुंद : अतिक्रमण हटाव मोहीम बासनात गुंडाळली रवी जवळे। लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : चंद्रपूर शहर वरकरणी बरे दिसत असले तरी ते आतल्या आत दाटीवाटीमुळे गुदमरत आहे. प्रत्येक गल्लीबोळात फोफावलेले अतिक्रमण यासाठी कारणीभूत आहे. मनपा प्रशासन यापासून अनभिज्ञ नाही. मात्र कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाचे हात अद्याप धजावले नाही. अतिक्रमणावर बेधडकपणे चालणारा बुलडोजरही मागील १५ वर्षात मनपाला मिळाला नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत असून अतिक्रमणाचा प्रश्न चंद्रपुरात ऐरणीवर आला आहे. ही समस्या आजच सोडविली नाही, तर पुढे याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असून चंद्रपूरचे सौंदर्य कायम ग्रहणांकितच राहणार आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखापर्यंत पोहचली आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख्य रस्ते समजले जातात. या मार्गावरून वाहने जातात आणि परतही येतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. सायंकाळच्या सुमारास तर ही वर्दळ आणखी वाढते. ुनगर विकास आराखड्यात महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग सुमारे ७० ते ८० फुट रुंद असावा, असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात हे दोन्ही रस्ते सुमारे ५० फुट रुंदच आहे. रस्ते तयार करताना पूर्वीच नगर विकास आराखड्याची अमलबजावणी पालिका प्रशासनाने केली नाही. आता मनपा प्रशासनही या भानगडीत पडताना दिसून येत नाही. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दोन्ही बाजुला वाहनांची पार्र्कींग असते. त्यामुळे वाहनांच्या मार्गक्रमणासाठी केवळ ३० फुटाचाच रस्ता शिल्लक राहतो. वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे किमान जिथे वाहनांचा सर्वाधिक संपर्क येतो, त्या महात्मा गांधी व कस्तुरबा मार्गांना रुंद करणे गरजेचे आहे. चंद्रपुरात मनपा झाली तरी हे मार्ग रुंद होऊ शकले नाही. उलट अनेक ठिकाणी हे रस्ते जरा निमुळतेच झाले आहे. या रस्त्यांवरच बाजारपेठ असल्याने अनेक व्यावसायिकांनी रस्त्यांवर पक्के बांधकाम केले आहे. काही जागा व्यावसायिकांची असली तरी नगर विकास आराखड्यानुसार महापालिकेने रस्त्यांसाठी ही जागा व्यावसायिकांकडून संपादन केली नाही. मनपाने पादचाऱ्यांसाठी रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ तयार केले. मात्र या फुटपाथवरही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. ही बाब सर्वांच्याच दृष्टीस पडते. मात्र कुणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही. काही व्यावसायिकांनी तर फुटपाथवर पक्के बांधकाम केले. काही महिन्यांपूर्वी मनपाने फुटपाथवरील हे बांधकाम काही ठिकाणी पाडून फुटपाथ मोकळा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी परिस्थिती पुन्हा जैसे थे आहे. रोजची वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांची ओरड बघून मनपाच्या एका आमसभेत सर्व नगरसेवकांनी हा प्रश्न उचलून धरला आणि रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात येणार होता. नगरविकास आराखड्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण करताना मनपा भूसंपादनही करणार होते. महात्मा गांधी मार्ग व कस्तुरबा मार्ग या दोन रस्त्यांचा विचार केला तर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणावर बुलडोजर चालणे अपेक्षित होते. प्रारंभी सहा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम विचारात घेण्यात आले होते. पावसाळा आटोपत आला की रस्त्यांवर निळी लाईन टाकण्यात येणार होती. तिथपर्यंत विहित रस्ता असेल. त्यासमोरची जेवढी जागा नियमानुसार सोडायची असेल, तिथे रेड लाईन टाकण्यात येणार होती. अतिक्रमणधारकांना दोन महिन्याची मुदत देण्यात येणार होती. अतिक्रमण काढले नाही तर थेट बुलडोजर चालवून रस्ता मोकळा करण्यात येणार होता. असे तत्कालीन मनपा आयुक्तांनीच यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र ही कार्यवाही नियमबाह्य इमारतीसारखीच तत्कालीन मनपा आयुक्तांनी मध्येच थांबविली, नव्हेतर सुरूच केली नसल्याचे दिसून येते. उल्लेखनीय असे की सध्या चंद्रपूरचा चेहरामोहरा हळूहळू बदलत चालला आहे. शहर महानगर होऊ पाहतेयं. मात्र चंद्रपूर शहराचा मूळ भाग अजूनही विकासाच्या प्रवाहात आलेला दिसून येत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटवून सुंदर चंद्रपूर चंद्रपूरकरांचा हाती देणे मनपाचे कर्तव्यच आहे. नदीपात्रातही अतिक्रमण ४चंद्रपुरात वाट्टेल तिथे अतिक्रमण करण्यात आले आहे. यातून चंद्रपुरातून वाहणाऱ्या इरई व झरपट नदीही सुटू शकल्या नाहीत. महाकाली प्रभागातील झरपट नदीपात्रातच नागरिकांनी घरे बांधली आहेत. याशिवाय इरईच्या पूरबुडित क्षेत्रातही अतिक्रमण करून नागरिकांनी घरे बांधली आहेत. या अतिक्रमणाचा पावसाळ्यात सर्वाधिक फटका याच अतिक्रमणधारकांना बसतो. तरीही परिस्थिती आजवर सुधारलेली नाही. मोठे नालेही गिळंकृत ४चंद्रपूर शहरातील अनेक भागातून मोठे नाले वाहतात. या नाल्यावरही अनेकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. काही ठिकाणी तर या नाल्यावर पक्के बांधकाम करून नालेच गिळंकृत केले आहे. त्यामुळे या नाल्यांचा उपसा जेसीबी मशीनद्वारे शक्य नाही. परिणामी पावसाळ्यात बॅक वाटरची परिस्थिती उदभवून शहर सौंदय बाधित होत आहे. अग्निशमन वाहनच जाईना ! ४प्रत्येक घरापर्यंत रुग्णावाहिका आणि अग्निशमन