शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

शासनाकडून ‘कन्हाळगाव’ नव्या अभयारण्याच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 06:00 IST

अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासाठी विरोध दिसून येत आहे.

ठळक मुद्देवन्यजीव बैठकीत निर्णय : गावकऱ्यांच्या मतांवरच ठरणार अभयारण्याचे भवितव्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य होण्याबाबत शासनाकडून तत्वत: मान्यता प्राप्त झाली असून हालचालींना वेग आला आहे. मात्र कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याची पुढील कार्यवाही होण्यापूर्वी कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावकऱ्यांची मते घेणे आवश्यक असल्याचा निर्णय राज्यस्तरीय वन्यजीव बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या मतांवरच या अभयारण्याचे भवितव्य ठरणार आहे.अभयारण्याबाबत नागरिकांची मते घेण्यासाठी प्रत्येक गावात विशेष सभा घेऊन गावकऱ्यांचे मत घेण्याची कार्यवाही सुरु आहे. कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्यात एकूण ३३ गावांचा समावेश असून ही गावे १८ ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे.प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये विशेष सभेचे आयोजन करुन सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन अध्यक्ष, ग्रामसेवक, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात येत आहे.४ मार्च २०२० पासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष सभा बोलावून कन्हाळगाव वन्यजीव अभयारण्याबाबत गावकऱ्यांचे मत घेतली जात आहेत.या सभेमध्ये सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) पी. जी. कोडापे, सहाय्यक व्यवस्थापक (एफडीसीएम) कोपीलवार, मेश्राम व संबधित वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करीत आहे. मध्यचांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व विभागीय व्यवस्थापक रेड्डी (एफडीसीएम) यांच्या मार्गदर्शनात सभा घेण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान, नागरिकांच्या मतांवरच या अभयारण्याचे भवितव्य ठरणार असल्याने नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळविण्यासाठी वनाधिकारी कसून प्रयत्न करीत आहेत. ज्या ठिकाणी सभा झाल्या, तिथे गावकºयांनी आपल्या मागण्या पुढे केल्या आहेत.कन्हाळगाव अभयारण्यासाठी गावकऱ्यांचा विरोधआक्सापूर : महाराष्ट्र-तेलंगाना सीमेवरील मध्यचांदा वनविभाग व वन प्रकल्पाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून लगतच्या ताडोबा प्रमाणेच पर्यटकांना येथील जंगलानेसुध्दा भुरळ घातली आहे. अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासाठी विरोध दिसून येत आहे. यामुळे नवीन अभयारण्य निर्मितीसाठी अडचण निर्माण होणार आहे. या प्रस्तावित अभयारण्यात सर्वाधिक गोंडपिपरी तालुक्यातील गावे समाविष्ट आहेत बल्लारपूर व पोभुर्णा तालुक्यातील काही गावांचादेखील समावेश आहे. सभेमध्ये वनविभागाकडून अभयारण्यासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. अभयारण्यानंतरच्या नफा व तोट्याबाबत यावेळी चर्चा केली जात आहे. मात्र बहुतांश सभेमध्ये ग्रामस्थ या प्रस्तावाला विरोध करीत आहेत. गावकºयांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतरच ग्रामस्थ आपला निर्णय बदलवायला तयार आहेत.अशा आहेत मागण्याशासनाने गावातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला अभयारण्यात रोजगार द्यावा, लोकांच्या लाकुडफाट्याची गरज पूर्ण करावी, जंगलावरील गावाचा हक्क कायम ठेवावा, तेंदुपता संकलन हंगाम बंद करू नये, वन्यजीवापासून शेतपिकाचे नुकसान टाळण्यासाठी कडक उपाययोजना करावी, स्थानिकांना शाश्वत रोजगाराची हमी द्यावी, अशा नागरिकांच्या मागण्या आहेत.

टॅग्स :forest departmentवनविभाग