शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये एबीचा घोळ

By admin | Updated: February 3, 2017 01:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती.

चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती. काँग्रेसमध्य आपल्याच पक्षातील उमेदवारांविरूद्ध एबी फार्म दिल्याच्या चर्चेने आणि त्यावरील आक्षेपामुळे काँग्रेसच्या घरातील भांडणाची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.गुरूवारी छानणीदरम्यान नकोडा-मार्डा आणि मूल तालुक्यातील राजोली या तीन ठिकाणी काँग्रेसच्या दोन उमेदवारांकडे वेगवेगळे एबी फॉर्म असल्याची बाब उघडकीस आली. यावरून नक्की पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे ठरविताना अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. या घटनाक्रमानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या नेत्यांना ही बाब कळविली. त्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रदेश काँग्रेस कमेटीकडून स्विकृत झालेल्या उमेदावारांची यादीही सोबत जोडली. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन उमेदवार ठरविले असताना अशा पद्धतीने पक्षातील उमेदवाराविरोधातच एबी फॉर्म देणे हा प्रकार दुर्देवी असल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रिगंणात १,०२७ उमेदवार गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन गळाले तर, पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत गळाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणञयाची तारीख ५ फेब्रुवारी असून नवमवानकन परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षांकडे नाव लिहिलेले एबी फॉर्म दिले होते, असे ते म्हणाले. नकोडा-मार्डा येथील उमेदवाराकडे शौचालय नसल्याने नामांकन गळण्याची शक्यता होती. तर, राजोलीतील आमच्या पक्षाची उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. तमुळे पक्षाचे नुकसान नको यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षाकडे एबी फॉर्म देवून ठेवला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.