शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 14:14 IST

घोडपेठ तलावातील घटना

भद्रावती (चंद्रपूर) : तालुक्यातील घोडपेठ येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा मासेमारीसाठी वापरण्यात आलेल्या हवा भरलेल्या ट्यूबवरून तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

अंकुश रमेश नागपुरे (२८), रा. भद्रावती असे मृताचे नाव आहे. मच्छिंद्र मछुआ संस्थेतर्फे हा तलाव सदस्यांना मासेमारीकरिता मंगळवार व बुधवारला रात्रपाळीसाठी देण्यात आला आहे. रात्रीला लावण्यात आलेल्या जाळ्यातील मासे काढण्याकरिता अंकुश हा आपल्या सहकाऱ्यासोबत तलावात गेला होता. मासे काढून झाल्यानंतर परतीच्या वेळेस अचानक हवा भरलेला ट्यूबवरून त्याचा तोल गेला व तो खोल पाण्यात बुडाला.

उपस्थित असलेल्या सदस्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा बुडून मृत्यू झाला होता. संस्था स्थापनेपासून मासेमारी करत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेchandrapur-acचंद्रपूर