शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मित्राने फोन करून पानठेल्यावर बोलाविले आणि केला ‘गेम’; प्रेम प्रकरणातून काटा काढल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2023 21:35 IST

Nagpur News वरोरा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकावर भरदिवसा काठीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास विकासनगरात घडली.

चंद्रपूरः वरोरा शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकावर भरदिवसा काठीने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास विकासनगरात घडली.

रितेश रामचंद्र लोहकरे (वय २०), रा. विकासनगर, वरोरा, असे मृताचे नाव आहे. हत्येनंतर एलसीबीच्या पथकाने चार तासांतच आरोपी गोलू ऊर्फ अमिनीश रेड्डी याला अटक केली. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.रितेश लोहकरे हा युवक शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. शनिवारी सकाळी त्याच्या एका मित्राने रितेशला फोन करून त्याच्या घरानजीकच्या पानठेल्यावर बोलाविले. तिथे काही युवक आधीच रितेशची वाट बघत होते. रितेश आणि त्या तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढविला. त्यात रितेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर हे सर्व युवक घटनास्थळावरून फरार झाले.घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला. शवपरीक्षणानंतर कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. हत्येप्रकरणी एकाला अटक केली; परंतु हत्येचा घटनाक्रम गुलदस्त्यात ठेवल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मारेकऱ्यांचे वर्णन

महाविद्यालयीन युवक रितेश लोहकरे याला काठीने बेदम मारहाण करताना विकासनगरातील पानठेला चौकात असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. एलसीबीच्या पथकाने आरोपी गोलू ऊर्फ अमिनीश रेड्डी याला अटक केली. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी आणखी काही युवकांची नावे सांगितल्याने पाेलिस कसून तपास करीत आहेत.

एसपींनी जाणून घेतली माहितीभरदिवसा महाविद्यालयीन युवकाची हत्या झाल्याचे कळताच पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी वरोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्याकडून इत्थंभूत माहिती सकाळी जाणून घेतली. या प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करावी, असे निर्देश दिले.

हत्या प्रकरणात एकाला अटक केली. मात्र, प्रत्यक्षदर्शी व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. हत्या प्रकरणातून कुणीही आरोपी सुटू नये, यादृष्टीने तपास सुरू आहे. हत्या प्रेम प्रकरणातून झाली का, याबाबतही चौकशी केली जात आहे.-अमोल काचोरे, ठाणेदार, वरोरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी