शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात श्रीगणेशाच्या विसर्जनासाठी दीड हजार पोलिसांची फौज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:49 IST

तगडा बंदोबस्त : चौकाचौकात राहणार तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : लाडक्या बाप्पाला अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात येणार आहे. चंद्रपूर पोलिसांकडून उत्सवाच्या कालावधीत शहरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून, दीड हजारांवर पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, २२ पोलिस निरीक्षक, ८० सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, ८०० पोलिस कर्मचारी व एक हजार होमगार्ड यांचा समावेश आहे.

उत्सवाच्या काळात संभाव्य घातपाती कारवाया, अनुचित घटनांचा धोका विचारात घेऊन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कडेकोट बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जनावेळी शहरातील मध्यभागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. भाविकांचे मोबाइल, दागिने चोरी, तसेच अनुचित प्रकार रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस कार्यरत असणार आहेत. विसर्जनासाठी दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे.

राज्य राखीव दलाची तुकडी तैनात विसर्जनासाठी दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी, शीघ्र कृती दल, गुन्हे शाखेची पथके, बाहेरगावाहून मागविण्यात आलेले पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश आहे. यासोबतच पोलिस मित्रही राहणार आहे

इरई नदीच्या कुंडात होणार विसर्जन चंद्रपूर शहर मनपाने इरई नदीच्या पात्रात विसर्जन कुंड तयार केले आहे. येथे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे. तसे नियोजन केले आहे.

१५०० पोलिसांची फौज पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्यासह सहा उपविभागीय पोलिस अधिकारी, २२ पीआय, ८० एपीआय, पोलिस उपनिरीक्षक, ८०० पोलिस कर्मचारी व एक हजार होमगार्डचा समावेश आहे

चौकाचौकात तयार केल्या मचाण चंद्रपुरातील गणेश उत्सव शांततेत पार पडावा. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त गेला आहे. गर्दीत नियंत्रण ठेवता यावे, यासाठी चौकाचौकात मचाण तयार केले आहेत. यावर पोलिस कर्मचारी तैनार राहणार असून गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत.

पोलिस अधीक्षक म्हणतात... "प्रत्येक गणेश मंडळासोबत एक पोलिस कर्मचारी देण्यात आला आहे. शांततेत गणेश विसर्जन होण्याच्या अनुषंगाने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर निघावे. डीजेचा वापर करू नये, लेझर लाइटमुळे डोळ्याला धोका होण्याची शक्यता असल्याने त्यांचाही वापर करू नये, मिरवणुकीत कुणी अनुचित प्रकार करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांना सहकार्य करावे."- मुम्मका सुदर्शन, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024