शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

९२ सहकारी संस्थांवर येणार गंडांतर; ठेवीदार धास्तावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:29 IST

लेखा परीक्षणाला दिली बगल : अवसायनाचा प्रस्ताव 'डीडीआर'कडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लेखा परीक्षण करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ९२ सहकारी संस्था अवसायनात काढाव्यात, असा प्रस्ताव जिल्हा विशेष लेखा परीक्षण विभागाने जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला आहे.

सहकारी क्षेत्रातील नोंदणीकृत सहकारी संस्था व नागरी सहकारी पतसंस्थांना कायद्यानुसार दरवर्षी लेखा परीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. या संस्थांचा आर्थिक व्यवहार पारदर्शी असावा, हा यामागचा हेतू, नागरी सहकारी पतसंस्था व सहकारी संस्थांमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली जाते. सहकारी संस्थांचा कारभार करताना संचालक मंडळाला ठेवीदारांच्या हिताला बाधा आणता येत नाही. त्यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षण वर्ग- १ सहकारी संस्था विभागाकडून लेखापरीक्षण करून घ्यावे लागते. २०२३-२४मध्ये जिल्ह्यातील १ हजार ३३० सहकारी संस्थांना लेखा परीक्षण करून घेण्याची सूचना देण्यात आली होती. त्यापैकी ११८ संस्थांनी लेखा परीक्षण केले नव्हते. परिणामी २४ संस्था अवसायनात निघाल्या. लेखापरिक्षकांनी नोटीसा बजावूनही दुलर्क्ष केल्याने ९२ संस्थांवर कारवाईची शक्यता आहे. 

२४ संस्था आतापर्यंत अवसायनात निघाल्या आहेतअवसायनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव जिल्हा निबंधकांकडे सादर करण्यात आला आहे. यावर पुढे काय कारवाई होते, याकडे जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

प्रकरणे गुन्हे शाखेकडेठेवीदारांचे नुकसान होऊ नये, यासाठी ठेवीदार संरक्षण अधिनियम तयार करण्यात आला. या अधिनियमानुसार, सहकारी संस्थांच्या कारभाराबाबत शंका असल्यास तक्रार दाखल करता येते. काही प्रकरणे अजूनही आर्थिक गुन्हे शाखेकडे प्रलंबित असल्याची माहिती आहे. संस्था अवसायनात निघाल्यास ठेवीदारांचे कोट्यवधींचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

२३ नागरी सहकारी पतसंस्थाही गोत्यातनागरी सहकारी पतसंस्थांचा कोट्यवधींचा व्यवसाय असतो. मात्र, २३ नागरी सहकारी पतसंस्थांनी अद्याप लेखा परीक्षण केले नाही. त्यामुळे कारवाईचा प्रस्ताव सादर केला आहे.

लेखापरीक्षण कशासाठी ?लेखा परीक्षक संबंधित संस्थेचे लेखे, ताळेबंद, दस्तऐवज, सभांचे इतिवृत्त व ध्येयधोरण या सर्वांची विविध कसोट्या लावून तपासणी केली जाते. आर्थिक स्थिती, नफा व तोट्याची कारणे तपासतो. कर कायद्यांचे पालन केले जाते की नाही, याची खात्री करतो. पात्र ठरलेल्या संस्थेला तसे प्रमाणपत्र दिले जाते. यातून संस्थेची विश्वसनीयता वाढते. लेखा परीक्षणाला बगल देणाऱ्या संस्थांचा अहवाल जिल्हा विशेष लेखा परीक्षक (वर्ग १) सुधीर बन्सोड यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbankबँक