शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तरुण-तरुणींना व्यावसायिक पायलट होण्याची संधी राज्य शासनाकडून ९० टक्के अनुदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 13:24 IST

Chandrapur : अर्ज सादर करण्यासाठी आज शेवटची तारीख

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : नागपूर फ्लाइंग क्लबअंतर्गत चंद्रपूर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील १२ वी उत्तीर्ण (गणित व भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या १० विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट परवाना (कर्मशिअल पायलट लायसन्स) प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. या प्रशिक्षणाकरिता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थीना राज्य शासनाकडून ९० टक्के अनुदान (अंदाजे ३७ लक्ष) रुपये प्राप्त होणार असून, उर्वरित १० टक्के रक्कम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी स्वतः भरावयाची आहे. अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट शेवटची तारीख आहे. त्यानंतर लेखी परीक्षा होणार असून परीक्षा संपल्यानंतर, जिल्हा समितीद्वारे कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. विद्यार्थ्यास एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 

ही लागणार कागदपत्रे महाराष्ट्र राज्याचे विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील डोमीसाइल (अधिवास) प्रमाणपत्र, जन्मतारखेचा दाखला, १० वी व १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व मार्कशीट, मुख्याध्यापक, शाळेचे प्राचार्य, राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेले चारित्र्याचे प्रमाणपत्र, चंद्रपूर जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असल्याबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरिता जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे.

असे आहे निषक उमेदवार महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असावा, उमेदवाराची वयोमर्यादा किमान १८ वर्षे ते २८ वर्षे असावी, १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय घेऊन अनुसूचित जमातीकरिता किमान ६५ टक्के गुणांसह व अमागासकरिता किमान ७५ टक्के गुणांसह प्राप्त करून पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेला, झालेली उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहणार आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर