कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:54+5:302021-04-15T04:26:54+5:30

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत ...

90 farmers deprived of loan waiver scheme | कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

कर्जमाफी योजनेपासून ९० शेतकरी वंचित

googlenewsNext

तोहोगाव : तोहोगाव येथील ९० शेतकऱ्यांनी रितसर अर्ज केल्यानंतर पात्र असूनही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोरोना संसर्ग, लाॅकडाऊन, सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, नवीन कर्ज देण्यास बँकांचा नकार, अशा विवंचनेत शेतकरी सापडला असून, जगू की मरू, असा प्रश्न त्यांना पडला आहे. शेतीकरिता गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज घेतले. काही शेतकऱ्यांनी नियमित कर्ज योजनेचा लाभ घेतला. परंतु सततच्या नापिकीमुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणात शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात असल्याने कर्ज थकीत राहात आहे. कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत असतानाच तत्कालीन युती शासनाने आणि विद्यमान आघाडी सरकारनेही शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. मोठ्या आनंदाने शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा रितसर अर्ज भरला आणि कर्ज माफ होणारच, अशा आशेवर शेतकरी होते.

परंतु शासकीय घोडचूक, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा यामुळे शेकडो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.

याबाबत वंचित शेतकऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत हाकलून देत आहेत. दरम्यान, लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री, महसूल मंत्री, सहकारमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

अगोदरच कोरोना संकट, सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि पात्र असतानाही कर्जमाफीपासून वंचित झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने दखल घेऊन तत्काळ न्याय देण्याची मागणी शेतकरी किशोर कासनगोट्टूवार, पांडुरंग भगत, बंडू गौरकार, संदीप मोरे आदींनी केली आहे.

Web Title: 90 farmers deprived of loan waiver scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.