शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

९२ गावांना बसणार पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला ...

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा अहवालअल्प पावसामुळे आटल्या विहिरीजि. प.च्या उपाययोजनेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ७९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.भूजल सर्वेक्षण व विकास विभागाच्या १३४ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण वर्षातून तीनदा केले जाते. जानेवारी, मार्च व सप्टेंबर महिन्यात या विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतल्यानंतर पाणीटंचाईची स्थिती जाहीर केल्या जाते. जानेवारी महिन्यात भूजल यंत्रणेने विहिीरींतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत ०.४९ सेंटिमीटरने घट झाल्याचे वास्तव पुढे आले. बल्लारपूर १.१४ तर भद्रावती तालुक्याची पातळी १.२९ सेंटिमीटरने घटली. अन्य तालुक्यांचीही स्थिती सारखीच असल्याचे पुढे आले. सावली तालुक्यातील १० गावे, कोरपना ८, चिमूर ७, राजुरा ६, भद्रावती ७, आणि चंद्रपूर तालुक्यातील ७ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.पाणी टंचाईसदृश परिस्थितीचा अहवाल संबंधित यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टंचाई आराखडा तयार करणार आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, सावली, मूल, सिंदेवाही, चिमूर, राजुरा, चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील ४७ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिके वाचण्यासाठी धडपड करावी लागली. त्यामुळे तत्काळ उपाययोजनेची मागणी केली जात आहे.तीन गावांची पाणीपुरवठा योजना ठप्पगांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज, रूई, पाचगाव येथील नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या गावांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि. प. प्रशासनाने उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.नीलज, रूई व पाचगाव येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची नळयोजना आहे. काही महिन्यांपासून ब्रह्मपुरी - आरमोरी या राष्टÑीय मार्गाचे काम सुरू आहे. जुनी पाइपलाईन या मार्गाच्या आड आहे. पुणे येथील कंत्राटदाराकडून महिनाभरापासून नवीन पाइपलाईनचे काम सुरू आहे. पण नवीन पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाइपलाइनमधील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पाइपलाईनचे काम निकृष्ट झाल्यानेच ही परिस्थिती उद्भवली. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याला माहिती देण्यात आली. मात्र, दखल घेतली नाही, असा आरोप सरपंच कविता राहाटे, सुजीत बालपांडे, रंजना शिऊरकार आदींनी केल आहे.