शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ८९१ वीज ग्राहक झाले स्वावलंबी; मिळते ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 15:39 IST

घरांच्या छतावर झाली सौर ऊर्जा निर्मिती : योजनेला मिळतोय जिल्ह्यातून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : प्रधानमंत्री सूर्यधर मोफत वीज योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८९१ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतः तयार करण्यास सुरुवात केली आहे. पर्यायाने ते विजेबाबत जिल्ह्यातील वीज ग्राहक स्वावलंबी झाले आहेत. 

केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. सौर प्रकल्पातून ग्राहकांच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबासाठी प्रती किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅट पर्यंत मिळते. तीन किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. 

बँकेकडून कर्ज उपलब्ध महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोल नेट मीटर देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रुफटॉप बसविणाऱ्या एजन्सीसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅट पर्यंत क्षमतेसाठी तत्काळ स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.

महावितरणच्या योजनांमुळे दिलासा.... महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांसाठी विविध योजना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सौर पंप, तसेच सूर्यघर योजनांसह विविध योजनांमुळे वीज ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. महावितरणच्या योजनांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आलेले आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसविण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते, जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेती