चंद्रपूर : जिल्ह्यात चालू वर्षात ८८५ नवीन कुुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा कमी असला तरी पाहिजे त्या प्रमाणात आजही कुष्ठरोग निर्मूलन झाले नाही. जिल्ह्यात १९ जणांना विकृती असून ९७ बालक पिडीत आहे. चालु वर्षामध्ये १३ जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.राज्यामध्ये कुष्ठरुग्णांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. २०१४ मध्ये १ हजार २९३ कुष्ठरुग्णांची नोंद करण्यात आली.या वर्षात ८८५ एवढे कुष्ठरुग्ण आढळून आले. यामध्ये ९७ मुलांना कृष्ठरोग झाल्याचे निदान झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहे. कुष्ठरुग्णांपैकी ११ रुग्णांवर आंदवन तथा दोन रुग्णांना अमरावती येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.मागील वर्षी जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि आनंदवनच्या संयुक्त विद्यमाने मागासवर्गीय कुष्ठरुग्णांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आंदवनमध्ये प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली. या अंतर्गत सध्यास्थितीत दोघेजण व्यवसाय करीत असून नऊ जणांचे प्रशिक्षण सुरु आहे. मात्र या योजनेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. (नगर प्रतिनिधी)
८८५ नवीन कुष्ठरुग्णांची भर
By admin | Updated: January 31, 2015 01:08 IST