शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

८२७ ग्रामपंचायती, ८० हजार झाडांचे लक्ष्य! चंद्रपूरमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेतून वृक्षलागवडीची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:45 IST

जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयारी सुरू : उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा राहणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'एक पेड माँ के नाम' या अभिनव संकल्पनेतून केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने देशभर वृक्षलागवडीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० रोपांची लागवड करावी, अशा सूचना पंचायतराज संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातही सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हजारो वृक्षांचे रोपण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रोपाला लागवड करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रींचे नाव दिले जाणार आहे. या भावनिक संकल्पनेमुळे वृक्षलागवडीस वैयक्तिक व सामाजिक समर्पणाची भावनाही जोडली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेशी सुसंगत अशी ही मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक बांधिलकीची भावना जागवणारी ठरत आहे. शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० झाडे लावल्यास, ८० हजारांवर वृक्षारोपण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा उपक्रम'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात वृक्षारोपणाला झाली सुरुवातजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात ५ जूनपासून या मोहिमेंतर्गत काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

'मर' लागलेल्या झाडांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुन्हा रोपण'एक पेड माँ के नाम' या मोहिमेतून जी रोपे योग्यरीत्या तग धरू शकणार नाहीत, त्यांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुनर्लागवड केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ८२७ग्रामपंचायती समाविष्ट !जिल्ह्यात ८२७ ग्रामपंचायती असून, सर्व ठिकाणी रोपांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'एक पेड माँ के नाम' मोहिमेची तयारीजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी करून घेत विशेष वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे.

मातोश्रींच्या नावाने झाडांना ओळखगाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आल्यानंतर त्या प्रत्येक झाडांचे संगोपन करणारी व्यक्ती आपल्या आईच्या नावाने त्या झाडाचे नामकरण करणार असल्याची संकल्पना आहे.

शासकीय कार्यालये, शाळांच्या आवारात झाडे लावणारग्रामपंचायत व्यतिरिक्त शाळा, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्र, तलाठी व मंडळ कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.

"वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेमुळे ग्रामीण स्तरावर पर्यावरण जागृती आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे."- पुलकित सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर