शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बीआयटी उभारणार ८०० शौचालये

By admin | Updated: October 7, 2015 02:07 IST

ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर ...

गोदरीमुक्तीचा संकल्प : विद्यार्थ्यांसाठी अभियंते घेणार पुढाकारचंद्रपूर : ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये ८०० शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाविद्यालयातील एमबीएचे विद्यार्थी आणि बीआयटीचे अभियंते पुढाकार घेणार आहेत.अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या उपस्थितीत या संदर्भात अलिकडेच एक बैठक पार पडली. यावेळी सरपंच सुशीला मडावी (कळमना), शिवकला आत्राम (किन्ही), सविता धोडरे (मानोरा), शकुंतला टोंगे (कोर्टी मक्ता), शंकर खोब्रागडे (पळसगाव), अर्चना वासाडे (आमडी), वासुदेव येरगुडे (किन्ही) आणि इटोलीचे सरपंच गोपाल बोभाटे बैठकीत सहभागी झाले होते.मागील काही वर्षांपासून बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीतर्फे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सामूहिक शेतीच्या माध्यमातून करण्याचा प्रकल्प बीआयटीने उभारला आहे. आता बीआयटीच्या परिसरात असणाऱ्या गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आजही उघड्यावर शौचास जावे लागते. शासनाच्या आवाहनाला जनतेकडून तसा प्रतिसाद दिसत नाही. शौचालय बांधण्यासाठी शासनाने १२ हजार रुपयाचे अनुदान जाहीर केलेले असताना बऱ्याच लोकांना शेतीच्या कामामुळे व इतर व्यस्ततेमुळे शौचालय बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे कठीण होवून बसले. या विषयाचा अभ्यास बीआयटीने केल्यानंतर एका दिवसात तयार होणारे शौचालय बांधून दिल्यास अनेक गावे गोदरीमुक्त होऊ शकतात. ही संकल्पना समोर आली. त्याच आधारावर प्रायोगिक तत्वावर येनबोडी येथे एक शौचालय उभारण्यात आल्यानंतर परिसरातील कळमना, किन्ही, मानोरा, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, इटोली, कोठारी येथील सर्वेक्षण बीआयटीच्या माध्यमातून करण्यात आले. कळमना येथे २८, मानोऱ्यात ८०, कोर्टीमक्ता येथे ३०, पळसगाव ६०, आमडी येथे ३०, इटोली येथे ३० तर कोठारी येथे १७५ याप्रमाणे इतर गावांचा विचार केला असता एकूण ८०० शौचालय उभारल्यास दहा गावे गोदरीमुक्त होऊ शकतात, असे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाचा वापर करीत शौचालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, चंदा सोयाम, उपसरपंच सुनील बावणे, वासुदेव येरगुडे, मधुकर बोंडे, गोविंदा उपरे, धाडू दुधबळे यांच्यासह सरपंच उपसरपंचाची व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)