शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

८० टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना मिळणार घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:32 IST

जिल्ह्यात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्ह्यातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन : आनंदवन येथे दिव्यांगांना स्वयंचलित सायकलचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात एक हजार दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल देण्याचे जरी आपण जाहीर केले असले, तरीही जिल्ह्यातील शेवटच्या दिव्यांगाला सायकल मिळेपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. ८० टक्के दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग बांधवांना शासनातर्फे घरकूल बांधून देण्याचा निर्णय आम्ही घेतला असून या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूदसुध्दा करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या योजनांसाठीच्या अनुदानात सहाशे रूपयावरून एक हजार रुपए इतकी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दिव्यांग बांधवांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.गुरुवारी वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे आयोजित अटल दिव्यांग स्वावलंबन मिशन अंतर्गत दिव्यांगांना स्वयंचलित तीन चाकी सायकल वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष व बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, वरोरा नगर परिषदेचे अध्यक्ष अहेतेशाम अली, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्?य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, एसीसीचे महाप्रबंधक खटी, वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी बल्लाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्या आनंदवन परिसरात हा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या आनंदवनातून जाताना माणूस आनंद घेवून जातो व तो आनंद इतरांनाही देण्याचा प्रयत्न करतो. कर्मयोगी कै. बाबा आमटे यांची ही कर्मभूमी नेहमीच दिव्यांगांना आत्मनिर्भरतेचा संदेश देत आली आहे. हाच संदेश पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे दिव्यांग व्यवसाय करू इच्छीतात त्यांना बॅटरी आॅपरेटेड वाहने अर्थात शॉप आॅन वेहीकल देण्याचा निर्णयसुध्दा आम्ही केला आहे. त्या माध्यमातून भाजी विक्री, पेपर विक्री व अन्य व्यवसाय ते करू शकतील. संजय गांधी निराधार योजना तसेच सामाजिक अर्थसहाय्याच्या अन्य योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थात वृध्द, निराधार, दिव्यांग आदींना दोन महिन्यात अनुदानाचे पैसे न दिल्यास विलंबाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी बोलताना त्यांनी दिला. विधवा व निराधार महिलांच्या स्वयंरोजगारासाठी विशेष कार्यक्रम शासन राबविणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.कधी नव्हे एवढा विकास-आमटेयावेळी बोलताना डॉ. विकास आमटे म्हणाले, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाला असून यापूर्वी कधी नव्हे इतका विकास जिल्ह्यातील नागरिक अनुभवत आहे. विशेषत: दिव्यांगांच्या चेहºयावर आनंद निर्माण व्हावा यासाठी ते गेली अनेक वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहे. आनंदवन परिवार याचा साक्षीदार असल्याचेही विकास आमटे यावेळी बोलताना म्हणाले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार