शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

80 दारूविक्री परवान्यांवर प्रशासनाकडून शिक्कामोर्तब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यामध्ये जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती दिल्या आहेत. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न झालेल्या तत्कालीन परवानाधारकांनी विनंती केल्यास ३१ मार्च २०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या, त्याच जागेवर ‘अ‍ॅज इज वेअर इज’ तत्त्वाप्रमाणे २०२१-२२ चे नूतनीकरण शुल्क आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास परवानगी देण्याचे नमूद आहे

ठळक मुद्देतीन दिवसांत मुहूर्त : मंजूर परवान्यांत देशीऐवजी बारची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर दुकाने केव्हा सुरू होणार, याकडे मद्यप्रेमींच्या नजरा लागल्या असतानाच नियम व अटींची १०० टक्के पूर्तता झाल्याने सुमारे ८० परवान्यांवर प्रशासनाने अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे मंजूर परवान्यांत बारची संख्या अधिक असल्याचे समजते. त्यामुळे येत्या  दोन-तीन दिवसांत दारूची दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासनाने याबाबत अद्याप अधिकृत माहिती जाहीर केली नाही.जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना जारी केली. त्यामध्ये जुन्या परवान्यांच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती दिल्या आहेत. त्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याबाहेर स्थलांतरित न झालेल्या तत्कालीन परवानाधारकांनी विनंती केल्यास ३१ मार्च २०१५ रोजी जिल्ह्यात जिथे कार्यरत होत्या, त्याच जागेवर ‘अ‍ॅज इज वेअर इज’ तत्त्वाप्रमाणे २०२१-२२ चे नूतनीकरण शुल्क आणि इतर आवश्यक बाबींची पूर्तता केल्यास परवानगी देण्याचे नमूद आहे. त्यानंतर गृह विभागानेही एक आदेश जारी करून नऊ अटी आणि शर्ती लागू केल्या. याशिवाय ११ जून २०२१ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी ११ अटी असलेल्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना केल्या. या सर्व अटी व शर्तींमध्ये पात्र ठरलेल्या सुमारे ८० परवान्यांना अंतिम मंजुरी देण्यात आली. यामध्ये देशी दारूऐवजी बार परवान्यांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे.

जमिनीच्या वादामुळे अडकले बहुतांश अर्ज

दारूविक्री परवानासाठी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, चंद्रपूर यांच्या कार्यालयात प्राप्त झालेल्या १२६ अर्जांपैकी १२४ अर्जांची संबंधित यंत्रणेने पडताळणी पूर्ण केली. मोका चौकशी करून त्रुटी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. बहुतांश प्रकरणात जागेच्या अडचणी पुढे आल्या आहेत. जागेबाबत अनेकांमध्ये वाद आहेत. याशिवाय महापालिकेचा कर थकीत असल्याने काही अर्ज मंजुरीविना अडकले. कर विभागानेही थकबाकीदारांची यादी पुढे केली. त्यामुळे अटी व शर्तींची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांची धावपळ सुरूच आहे.

मद्यप्रेमींमध्ये रंगू लागला गप्पांचा फड चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यापासून मद्यप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यावर लवकरच दारूची दुकाने सुरू होणार, या चर्चेला उधाण आले होते.  निर्बंध हटविल्यानंतर ‘आता तर सुरूच होणार’ असा फड रंगू लागला. दरम्यान, कोराेना डेल्टा प्लस धास्तीमुळे जिल्हा प्रशासनाने सोमवार (दि. २८) पासून निर्बंध लागू केले. त्यामुळे ‘पुन्हा वाट पाहावी लागणार’ यावरून समाजमाध्यमांतही  मद्यप्रेमींची फिरकी घेणारे मिम्स व्हायरल झाले आहेत. 

दारूविक्री परवान्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी आणि मोका चौकशी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सद्य:स्थितीत ८० प्रकरणे सर्व नियम व अटींमध्ये पात्र ठरलीत. मात्र, अंतिम प्रक्रियेला पुन्हा दोन-तीन दिवस लागू शकतात.    - सागर धोमकर, अधीक्षक,  उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर

 

टॅग्स :liquor banदारूबंदी