शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

७७.२६ टक्के वीजबिलांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.

ठळक मुद्देमहावितरणची जनजागृती : विभागात सात लाख ८७ हजार ग्राहक

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा फटका  महावितरण कंपनीलाही बसला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल माफ करण्याच्या मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, शासनाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. या काळात थकीत वीज बिल वसुलीचे मोठे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. यासाठी  जनजागृती मोहीम महावितरणने हाती घेतली. दरम्यान, आक्टोबर महिन्यापर्यंत ७७.२६ टक्के वीज बिलांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लापूर, चंद्रपूर आणि वरोरा विभागाचा समावेश आहे. १ मार्च ते २६ आक्टोबर या दरम्यान लघु दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ४४९ कोटींवर पोहोचली होती. त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६३.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२  टक्के, चंद्रपूर विभाग ६७.८७ टक्के इतका विजभरणा होऊ शकला. आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रह्मपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के, इतका भरणा करण्यात आला. 

वीज बिल माफ करण्याची मागणी पडली मागेलाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत बिलामध्ये सुट द्यावी, आदी मागण्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या होत्या. यासाठी काही राजकीय तसेच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र सध्या ही मागणी मागे पडली आहे.

मोबाईल संदेशवीज बिल भरण्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. दरम्यान, काही ग्राहकांसोबत थेट संवादही साधण्यात आला. याचा फायदा महावितरणला झाला. सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी वीज कट होईल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे उसनवारी करून बील भरण्याचा प्रयत्न ते  करीत आहे.  ग्रामीण भागातील भरना जास्त आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल आले. त्यातच सर्वच बंद असल्यामुळे बिल भरण्याची समस्या होती. त्यामुळे अनेकांनी वीज बिल थकविले. दरम्यान, काहींनी आनलाईन भरना केला.

टॅग्स :electricityवीज