शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास

By admin | Updated: February 15, 2016 01:01 IST

कोरपना, जिवतीसारख्या दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाच्या त्रासाहन विविध व्याधींनी ग्रासले आहे.

विविध व्याधी : कमकुवत आरोग्य सेवेचा परिणामचंद्रपूर: कोरपना, जिवतीसारख्या दुर्गम भागातील ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाच्या त्रासाहन विविध व्याधींनी ग्रासले आहे. एका स्वयंसेवी संस्थेने जिवती तालुक्यातील आंबेझरी या दुर्गम आदिवासी गावात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरादरम्यान, ही बाब उजेडात आली आहे. या भागात असलेली कमकुवत आरोग्य सेवाच याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. शासनाच्यावतीने ग्रामीण भागातील आरोग्याच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र ही सेवा शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नसल्याचे यातून सिद्ध झाले आहे. चंद्रपुरातील मनोरमा हेल्थकेअर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जिवती तालुक्यातील आंबेझरी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात गावातील ३५० नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. त्यात ७० टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा आजार जडल्याची बाब समोर आहे. सोबतच ९० टक्के लोकांना गंभीर स्वरूपाचे आजार जडल्याचे तपासणीत दिसून आले, अशी माहिती डॉ.वैभव पोडचलवार यांनी दिली.जीवती हा अतिशय दुर्गम आणि आदिवासीबहुल तालुका आहे. या तालुक्यात अनेक समस्यांसह आरोग्य सेवेचाही अभाव आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र आहेत. मात्र त्या ठिकाणी डॉक्टर आणि कर्मचारी अभावानेच दिसून येतात. येथे कार्यरत कर्मचारी तालुका अथवा जिल्हास्थळावरून ये-जा करतात. अनेकदा येतही नाहीत. त्यामुळे आजारी रुग्णांचे हाल होतात. त्यातच या भागातील नागरिकांमध्ये अज्ञानही आहे. अवैज्ञानिक उपचारांवर त्यांचा अधिक भर असतो. लहान-सहान आजार ते अंगावरच काढतात. त्यातून हे आजार गंभीर स्वरूप धारण करतात. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (प्रतिनिधी)