शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘जाणता राजा’तून ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी जाणला महाराजांचा इतिहास

By साईनाथ कुचनकार | Updated: February 7, 2024 16:54 IST

चंद्रपूरमध्ये ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महानाट्याला जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावत शिवाजी महाराजांचा इतिहास जाणला.

चंद्रपूर :छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ‘जाणता राजा’ या महानाट्याचे प्रयोग राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. चंद्रपूरमध्ये ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित या महानाट्याला जिल्ह्यातील तब्बल ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी हजेरी लावत शिवाजी महाराजांचा इतिहास जाणला.

चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, मूल, पोंभुर्णा, भद्रावती, बल्लारपूर आणि वरोरा या आठ तालुक्यातील इयत्ता ८ वी, ९ वी आणि ११ वीच्या दररोज २ हजार ५०० विद्यार्थी याप्रमाणे एकूण ७ हजार ५०० विद्यार्थ्यांनी प्रयोगाला हजेरी लावली. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी दररोज ५३ बसेसची व्यवस्था केली होती. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नास्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे तीन दिवसात ७५०० ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोग अनुभवता आला.बाॅक्स

‘याची देही...याची डोळा’

जिल्ह्यात ‘जाणता राजा’ या महानाट्याचे तीन दिवस प्रयोग झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा उदंड प्रतिसाद पाहता, चंद्रपूर येथे एक अतिरिक्त दिवस वाढवून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हावासीयांना अनोखी भेट दिली. चार दिवसात हजारो नागरिकांनी ‘याची देही...याची डोळा’ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट प्रत्यक्षात अनुभवला. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे या महानाट्याने चंद्रपूरकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज