शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

बाधित गावांना ६६ टक्के निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 22:37 IST

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : खनिज विकास निधी आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ६६ टक्के निधी जिल्ह्यातील ६०६ प्रकल्पग्रस्त गावांच्या विकासासाठी खर्च केला जाणार आहे. यातून कोणतेही गाव सुटू नये याची दक्षता घ्यावा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार नाना शामकुळे, जिल्हाधिकारी कुणाल खेमकर, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, अधीक्षक अभियंता, जिल्हा खनिकर्म अधिकारी कांबळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ना. हंसराज अहीर म्हणाले, जिल्ह्यातील नगर आयुक्त, मुख्याधिकारी व सरपंचांनी खनिज निधीबाबत अत्यंत जागरूक राहून आपल्या हक्काचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा. गावाच्या गरजेनुसार प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा. प्रकल्पग्रस्त क्षेत्रामध्ये पिण्याचे शुद्ध पाणी ही मोठी गरज आहे. त्यासाठीच आरओ वॉटर एटीएम लावण्याचा निर्णय घेण्यात आला.बाजार ओट्यांचे सौदर्यीकरण, शाळा, ग्रा.पं., ग्रामीण पाणीपुरवठा यासारख्या स्थानिक उपक्रमात सोलर वीज व्यवस्थेसाठी योजना सुरू करण्यात येणार आहे. पांदन रस्त्याचा मोठा प्रश्न असून खनिज विकास अंतर्गत पांदन रस्ते तयार करण्याची जिल्ह्यात संधी आहे. त्याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असेही ना. अहीर यांनी सांगितले. हा निधी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दिल्यास प्रत्येक बाधीत व अप्रत्यक्ष बाधीत गावे व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निधी वाटप केल्यास तो न्यायोचित ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात कोणत्या योजना सुरू आहेत, याची माहिती जिल्हाधिकारी खेमणार व अन्य अधिकाºयांनी बैठकीत माहिती दिली.