शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

गटातटाच्या राजकारणाने ६० लाखांचा निधी अखर्चित; आपापसात अडवणुकीचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:58 IST

केळझर येथील विकासकामांना ब्रेक : मूलभूत सुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्क मूल: गावातील विकास कामांसाठी शासनाकडून १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. वर्षाला मिळणारा निधी त्याच वित्तीय वर्षात खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र मिळणारा निधी विकासकामांवर खर्च करण्याऐवजी सदस्यांकडून आपापसात अडवणुकीचे राजकारण केले जात असल्याने केळझर ग्रामपंचायतीचा ६० लाखांचा निधी अजूनही अखर्चित आहे.

त्यामुळे गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून नागरिकांत सदस्यांप्रति तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मूल तालुक्यातील २ हजार ७९३ लोकसंख्या असलेल्या केळझर ग्रामपंचायतीला वर्षाकाठी सुमारे १७ ते १८ लाखांचा निधी विकास कामांसाठी मिळतो. यामध्ये बंधित व अबंधित निधीच्या तरतुदीनुसार विकास कामांवर खर्च होणे अपेक्षित आहे. मात्र ग्रामपंचायतीचे सदस्यच विकास कामात अडवणुकीचे राजकारण करीत असल्याने वर्षाला मिळणारा निधी खर्च होत नाही. 

परिणामी गावातील विकासकामांना ब्रेक लागला असून ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगाच्या बँक खात्यात जवळपास ६० लाखांचा अखर्चित निधी शिल्लक आहे. केवळ विरोधाला विरोध न करता सहकार्य केल्यास गावातील विकास कामे होऊ शकतात. मात्र तसे होताना दिसत नाही. गावातील आवश्यक मूलभूत समस्या तत्काळ सोडवतील, या हेतूने नागरिक सदस्यांना निवडून देतात. परंतु समस्या सोडविण्याऐवजी उलट अडवणुकीचे राजकारण केले जात असल्याने युवक आणि सामान्य नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

पंचायत समितीने लक्ष देण्याची गरज मागील दोन वर्षांपासून केळझर ग्रामपंचायतीचे सदस्य आपापसात गटातटाचे राजकारण करीत आहेत. गावाच्या विकास कामांसाठी ग्रामपंचायतीला दरवर्षी लाखोंचा निधी मिळत आहे. मात्र तो विकास कामांवर खर्च केला जात नाही. पं. स. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

ही कामे खोळंबली ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावात पाणीपुरवठ्याची कामे, पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती, सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी गटारे बांधकाम, रहदारीसाठी अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकाम, आरोग्य उपकेंद्र साहित्य खरेदी करणे, जिल्हा परिषद शाळेला शैक्षणिक साहित्य खरेदी करणे, अंगणवाडीला खेळाचे साहित्य पुरवठा करणे अशी अनेक कामे करता येतात. मात्र निधीच खर्च होत नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणchandrapur-acचंद्रपूर