शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

६० ग्रामपंचायतींना मिळणार नव्या इमारती

By admin | Updated: July 23, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय ...

जीर्ण इमारती पाडणार : जिल्हा परिषदेच्या सभेत निर्णय चंद्रपूर : जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाला सभेत मंजूरी प्रदान करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध करून ग्राम पंचायतींना नव्या इमारती बांधून देण्यात येणार आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विरोधी सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे एका युवतीला जीव गमवावा लागला. तर चिमूर तालुक्यातील लावारीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका कर्तव्य बजावत नसल्याची तक्रार सतीश वाजूरकर यांनी केली होती. त्यावरही कारवाई करण्यात आली नाही. पण, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याने विरोधक आक्रमक होते. काही दिवसांपुर्वी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची पाहणी केली. या पाहणीत ६० ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण असल्याचा अहवाल पंचायत विभागाला पाठविला होता. तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांनीही इमारतींची समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्याकडे मांडली होती. त्यामुळे शुक्रवारच्या विशेष सभेत याा विषयावर चर्चा झाली व ६० ग्रामपंचायती पाडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नव्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश, जि. प. अध्यक्ष गुरूनुले यांनी पंचायत विभागाला दिले आहेत. यासोबतच जनावरांच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय रुग्णालयांना तातडीने औषध पुरवठा करण्यासाठी ७५ लाखांचा निधी खर्च करण्याची मंजूरी प्रदान करण्यात आली. यासोबत ब्रह्मपुरी तालुक्यातील नान्होरी, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे नवे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी) दोन तासात गुंडाळली सभा : अहीरकर सभा सुरू असताना वीज गेल्याने वीज येण्याची प्रतीक्षा न करता, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी सभा दोन तासात गुंडाळण्याचा विक्रम केला. गैरव्यवहारावर चर्चा होवू नये म्हणून जि. प. अध्यक्षांच्या सांगण्यानुसार जाणीवपुर्वक वीज पुरवठा बंद करण्यास आला, असा आरोप काँग्रेसचे जि. प. उपगटनेता विनोद अहीरकर यांनी केला आहे. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीने सर्व जि. प. सदस्य नाराज असून ३ महिन्यातून एकाच होणाऱ्या सभेत केवळ गैरव्यवहार लपविण्यासाठी सभा गुंडाळून टाकणे चुकीचे असून तातडीने पुन्हा सभा बोलवावी, असे विनोद अहीरकर यांनी म्हटले आहे.