शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बाजारात येण्यापूर्वीच ६ टन २१ किलो भेसळयुक्त तेल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 14:14 IST

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : तीन टन ३३५ किलो रवा, भेसन अन् मैद्यातही भेसळ

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दिवाळीच्या तोंडावर भेसळयुक्त पदार्थ बाजारपेठेत येण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासन सतर्क झाला असून, भरारी पथकाचे गठण केले आहे. मागील महिनाभरात या पथकाने खाद्य तेलासंदर्भातील तीन कारवाई करून तब्बल नऊ लाख ४९ हजार ६३ रुपयांचा सहा टन २१ किलो तेलाचा साठा तर रवा, मैदा, बेसनमध्ये भेसळ केल्यासंदर्भात दोन कारवाई करून चार लाख सहा हजार ६२२ रुपयांचा तीन टन ३३५ किलो रवा, मैदा, भेसनाचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे दूषित व भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

दिवाळीत प्रत्येक कुटुंबात पंच पक्वान्न बनविले जातात. त्यामुळे तेल, रवा, मैदा, बेसन, डालडा आदींची मागणी मोठ्या प्रमाणात असते. परिणामी जादा नफा कमविण्याच्या अनुषंगाने अनेक विक्रेते भेसळयुक्त पदार्थ विकण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अन्न व औषध प्रशासन यावर लक्ष ठेऊन असते. सहायक आयुक्त प्रवीण उमप यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या नेतृत्वातील चमूने जिल्ह्याभरातील संशयितांवर धाडसत्र राबवले आहे. मागील महिन्याभराचा विचार केल्यास भेसळयुक्त खाद्य तेलाच्या तीन कारवाया केल्या तर खाद्यपदार्थ मैदा, रवा, बेसन याच्या दोन कारवाया करून मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अद्यापही सुरुच राहणार आहे. 

भरारी पथकाची भेसळ व दूषित पदार्थांवर नजर 

  • दिवाळीत मिठाई, पेढे, चकल्या, शंकरपाळे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु हॉटेल, स्वीट मार्ट मर्चेंट भेसळ करून जादा नफा कमविण्याचा प्रयल करतात. 
  • परंतु सहायक आयुक्त प्रवीण उमप यांनी अन्न सुरक्षा अधिकारी गिरीष सातकर यांच्या नेतृत्वात अन्न व औषध विभागाची पथके गठित केली आहेत. ही पथके होणाऱ्या भेसळीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
  • संशयित नमुने घेऊन तपासणीला पाठवले जाणार आहेत. दोष आढळून आल्यास कारवाई केली जाणार आहे.

"खाद्यपदार्थ, खाद्यतेलाच्या होणाऱ्या भेसळीकडे आमचे लक्ष आहे. आम्ही भरारी पथकही गठित केले आहे. हे पथक अचानक धाड टाकून संशयित नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठवणार आहेत. दोष आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. मागील महिनाभरात आम्ही तब्बल सहा टन २१ किलो खाद्य तेल तर तीन टन ३३५ किलो रवा, मैदा, बेसन जप्त केले आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे." - प्रवीण उमप, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर

टॅग्स :Diwaliदिवाळी 2024chandrapur-acचंद्रपूर