६ हजार ८३ पथविक्रेत्यांना मिळाले १० हजार रुपयांचे कर्ज

By साईनाथ कुचनकार | Published: October 30, 2023 06:22 PM2023-10-30T18:22:19+5:302023-10-30T18:23:23+5:30

९०५ विक्रेत्यांना २० तर १०७ लाभार्थ्यांना ५० हजारांचे कर्ज

6 thousand 83 street vendors got a loan of 10 thousand rupees | ६ हजार ८३ पथविक्रेत्यांना मिळाले १० हजार रुपयांचे कर्ज

६ हजार ८३ पथविक्रेत्यांना मिळाले १० हजार रुपयांचे कर्ज

चंद्रपूर : प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना (पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ६ हजार ८३ पथविक्रेत्यांनी घेतला असून, ९०५ विक्रेत्यांना २० हजार रुपये तर १०७ लाभार्थ्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज मिळाले आहे.

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. अधिकाधिक पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने मनपाकडून विशेष शिबिरेदेखील आयोजित करण्यात आली होती.

योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता एका वर्षासाठी विनातारण १० हजार रुपयांचे राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत देण्यात येते. शहरातील राष्ट्रीयीकृत बँक या पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करून कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ज्या पथविक्रेत्यांनी नियमित कर्ज परतफेड केली त्यांना २० हजारांचे अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून, या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियान कार्यालय, बीपीएल ऑफिस, ज्युबली हायस्कूल समोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Web Title: 6 thousand 83 street vendors got a loan of 10 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.