शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यात ५७ रूग्णांना डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:13 IST

तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देतीन रूग्ण दगावले : उपचार होणारे रूग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.तालुक्याबाहेर खासगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी ६७ डेंग्यू रक्तजल नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी एका रूग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत २१३ डेंग्यू रक्त तपासणी झाली. त्यात ५७ जणांना लागण झाल्याचे आढळून आले असून तीन रूग्ण दगावले आहे.स्क्र ब टायफसच्या रूग्णांतही वाढवातावरणातील बदलामुळे यावर्षी किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे स्क्र ब टायफससारख्या नवीन आजारालाही समोर जावे लागले. याबाबतची माहिती खासगी रूग्णालयातून मिळत असली तरी त्याची नोंद मात्र शासन दरबारी नाही.ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्षसध्या हागणदारीमुक्त गाव व स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व निर्मल करण्याचे हाती घेतले असले तरी ग्रामपंचायतच्या उदासीन धोरणामुळे योजनेचे तीनतेरा वाजत आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, स्क्रॅब टायफस यासारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. असे आजार नागरिकांना होऊ नये, यासाठी प्रत्येक गाव व परिसरासाठी काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरी त्याचा फायदा होताना दिसत नाही. आजही ग्रामीण भागात शौचालयाला उघड्यावरच बसताना दिसत आहे. ग्रामपंचायत नोटीस बजावून सांगत असतानासुद्धा नागरिक जुमानत नाही.