शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५२७ एचआयव्ही रुग्ण

By admin | Updated: April 27, 2016 00:44 IST

प्रत्येक तालुकास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद केली जात आहे.

जनजागृती प्रभावी करण्याची गरज : ३२२ पुरुष तर २०२ महिलांचा समावेशप्रवीण खिरटकर वरोराप्रत्येक तालुकास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी करून एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद केली जात आहे. यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात ३२२ पुरुष, २०२ महिला व तीन तृतीय पंथी असे एकूण ५२६ एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहे. शासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्चुन जनजागृती केली जात असली तरी एचआयव्हीचा प्रसार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.एचआयव्हीचा समूळ नाईनाट झाला पाहिजे, याकरिता शासनाने मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात तपासण्या व समाज सेवी संस्थांना सोबत घेवून समाज प्रबोधन करणे सुरू सुरू केले आहे. यासाठी शासनाच्या वतीनेही कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, प्रत्येक तालुका व जिल्हा स्तरावरील शासकीय रुग्णालयात एचआयव्ही तपासणी करणारे केंद्र व जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी उपचार केंद्र तसेच त्याच केंद्रातून एचआयव्ही बाधितांना मार्गदर्शन देवून धिर दिला जात आहे. मागील काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील एचआयव्ही बाधीतांची संख्या कमी होत आहे, हे मान्य असले तरी जेवढ्या रुग्णांची नोंद दरवर्षी होत आहे, तो आकडाही मोठा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक गरोदर मातेला एचआयव्हीची तपासणी सक्तीची केली जात असल्याने एचआयव्ही निघाल्यास त्याची काळजी शासकीय रुग्णालयात घेतली जात आहे. मागील वर्षात ६० हजार २५६ पुरुष, महिला व तृतीय पंथीची तपासणी करण्यात आली. त्यात ३२२ पुरुष व २०२ ३२२ तर तीन तृतीयपंथी एचआयव्ही बाधित असल्याचे आढळून आले आहे. सहा एचआयव्ही रुग्ण बेपत्तायापूर्वीचे ४७२ एचआयव्ही बाधित रुग्ण उपचार केंद्रात नियमित औषधोपचार घेत असल्याची चंद्रपूर जिल्ह्यात नोंद आहे. परंतु प्रत्यक्षात औषधी उपचार घेणारे ४६६ रुग्ण आहेत. त्यामुळे सहा रुग्ण बेपत्ता असल्याने त्यांच्याबाबत संपर्क साधूनही होत नसल्याने या रुग्णाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.३८ तृतीयपंथीनी केली तपासणीचंद्रपूर जिल्ह्यात ३८ तृतीयपंथीनी एचआयव्ही तपासणी करून घेतली. त्यात तीन रुग्णांना एचआयव्ही झाल्याचे आढळून आले. शासनाने मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन कार्यक्रम एचआयव्हीपासून रोखण्याकरिता हाती घेतला आहे. तसेच अनेक ठिकाणी मोफत सल्ला व औषधी उपचार केंद्र सुरू केले आहे. या सोबतच आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या ठकाणी तपासणी केंद्र सुरू केल्याने एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत असून लवकरच आटोक्यात येईल.- सुमन पानगंटीवार, कार्यक्रम अधिकारी चंद्रपूरप्रभावी जनजागृतीची गरजशासनातर्फे ठिकठिकाणी एचआयव्ही, एड्सबाबत जनजागृती केली जात आहे. एचआयव्हीचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता बाळगली जात आहे. तरीही रुग्णांची नोंद होत असल्याने ही जनजागृती आणखी प्रभावी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.