शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

चंद्रपुरातील फुटलेले ‘ते’ जुने प्रभाग पुन्हा जुळणार? ५१ आक्षेपकर्त्यांच्या २ जुलैकडे नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2022 11:01 IST

जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते.

ठळक मुद्देआक्षेपांवर नागपुरात सुनावणी

चंद्रपूर : मनपाच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या नवीन २६ प्रभागांमुळे बऱ्याच जणांची पंचाईत झाली. त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह ५१ जणांनी प्रारूप प्रभागावर हरकती व आक्षेप नोंदविले होते. त्यावर सोमवारी नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. आता २ जुलैला अंतिम प्रभाग जाहीर होणार असल्याने ते पुटलेले प्रभाग पुन्हा जुळणार काय, याकडे आक्षेपकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत.

चंद्रपुरातील प्रभागांची पुनर्रचना होणार, हे गृहीत धरूनच सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही नगरसेवकांनी आपापल्या क्षमतेनुसार विकासकामे केली होती. आपल्या वाट्याला आलेल्या निधीचा त्या-त्या वाॅर्डांत विनियोग केला. मात्र, नवीन २६ प्रभागांच्या पुनर्रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होताच अनेकांचे अवसान गळाले. विकासकामे केलेला वाॅर्ड आपल्या प्रभागातच येत नसल्याचे पाहून पराजयाची धडकी भरली. शहरातील बहुतांश प्रभागांत मोठे फेरबदल झाले. त्यामुळे मनपात राजकारण करणारे माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांनी या प्रारूप आराखड्यावर आक्षेप नोंदविले. २२ जून २०२२ पर्यंत मनपाकडे ५१ जणांच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्या. त्यावर नागपुरात सोमवारी सुनावणी झाली.

प्रारूप प्रभागावर कुणी घेतला आक्षेप?

माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, संजय कंचर्लावार यांच्या प्रभागात बरेच बदल झाल्याने त्यांनी आक्षेप नोंदविला. याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी नगरसेविका सुनीता लोढिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय वैद्य, शिवसेनेच्या आखरे यांनीही त्यांचे आक्षेप व हरकती मांडल्या.

कुणाकडे मांडल्या हरकती?

चंद्रपुरातील २५ प्रारूप प्रभागांवर नागरिकांचे आक्षेप नोंदवून सुनावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने नागपूर एमएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांची नियुक्ती केली. त्यांच्यासमोर ५१ जणांच्या आक्षेप व हरकतींवर सुनावणी झाली. अंतिम आराखडा २ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध होईल. यावेळी रोहयो नागपूरच्या उपायुक्त राजलक्ष्मी शाह, चंद्रपूरच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विपिन पालिवाल यांच्यासह अधिकारी व अभियंत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Municipal Election 2022महानगरपालिका निवडणुक 2022chandrapur-acचंद्रपूर