शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

५०३ दुष्काळसदृश गावांना मिळणार सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:59 IST

दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी....

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी असलेल्या महसूली मंडळातील गावांना दुष्काळ घोषित करून विविध सवलती लागू केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५०३ गावांतील शेतकºयांना विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.दृष्काळसदृश परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य शासनाला अहवाल पाठविण्यात आला होता. या अहवालानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान ७५० मिमी पेक्षा कमी झालेल्या महसूली मंडळातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या राज्यातील ९३१ गावांना दुष्काळ सदृश म्हणून घोषित करण्यात आले होते.८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी व अद्यापही दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर न केलेल्या अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या उर्वरीत ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली.यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५०३ गावांचा समावेश आहे. अशा गावांना आठ सवलती लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.गुरूवारी शासनाने मंजुरी प्रदान केली. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.कार्यवाहीचा अनुपालन अहवाल अर्थ विभागाला सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांना देण्यात आला.दुष्काळसदृश गावांमध्ये उपाययोजना अंमलात आणण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.अशा आहेत सवलतीजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपाची वीज जोडणी खंडित करण्यास मनाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी