शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

५०० एलईडी पथदिवे फुस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:10 IST

शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहानगरात नाराजी : त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.महानगरपालिकेने शहरातील सर्वच प्रभागांमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या दिव्यांचा प्रकाश उत्तम असतो शिवाय वीज बीलही कमी येते. मनपाच्या सभेत हा विषय मांडल्यानंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी संमती प्रदान केली होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी एलईडी दिव्यांची खरेदी करण्यात आली. नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये हे पथदिवे लावण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खांबांवर पथदिवे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, काही प्रभागांतील सुमारे ५०० पथदिवे अचानक बंद झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशास्थितीत प्रभागात भरपूर उजेड देणारे पथदिवे सुरू ठेवणे गरजेचे आहे़ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे़ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाने अनेक योजना सुरू केल्या़ एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णयदेखील याच धोरणांचा परिपाक असल्याचे नागरिक सांगतात़ नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही नगरसेवकांनी एलईडी पथदिव्यांची समस्या मांडली. पावसाळ्यात पथदिवे बंद ठेवणे चुकीचे आहे़ विविध प्रभागातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.आता ‘त्या’ नगरसेवकांचेही दुर्लक्षमनपाने एलईडी पथदिवे लावल्यानंतर काही नगरसेवकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. प्रभागातील चौकामध्ये बॅनर लावून आपण किती जागरूक आहोत, याचेही दर्शन घडविले. विकास कामांची यादीही बॅनरवर झळकविली. परंतु, एलईडी पथदिवे बंद झाल्याने नगरसेवकांना आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत.