शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भरतेसाठी ५ हजार २० पथविक्रेत्यांना मिळाले १० हजारांचे कर्ज

By साईनाथ कुचनकार | Updated: September 22, 2023 16:47 IST

पीएम स्वनिधी योजना : अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार

चंद्रपूर : प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला आहे. योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजूर करणाऱ्या विविध बँकांचा गौरवपत्र देऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पीएम स्वनिधी योजनेत सर्व बँकांकडे एकूण ९ हजार ७०९ अर्ज प्राप्त झाले होते. यातील ७ हजार ४१९ अर्जधारक पात्र ठरले. यातील ५ हजार २० अर्जधारकांना कर्ज देण्यात आले आहे.

पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करून विहित मुदतीत अर्ज निकाली काढणाऱ्या व ७० टक्क्यांहून अधिक प्रकरणे मंजूर करणाऱ्या बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बँक, पीएनबी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूको बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या ११ बँकांना त्यांच्या कार्यासाठी गौरवपत्र देण्यात आले.

चंद्रपूर महानगरपालिका येथे यासंदर्भात आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मनपाच्या वतीने स्वनिधी से समृद्धी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानासंदर्भात बैठक घेऊन पथविक्रेत्यांसाठी केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

आत्मनिर्भरतेसाठी योजना

पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरिता एका वर्षासाठी विनातारण १० हजार रुपयांचे कर्ज राष्ट्रीयीकृत बँकामार्फत देण्यात येते. चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरिता ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू आहे. सर्व पथविक्रेत्यांनी १० हजार रुपये कर्जासाठी अर्ज करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक प्रशांत धोंगळे यांच्यासह इतर बँकेचे प्रबंधक, शहर अभियान व्यवस्थापक रफीक शेख, रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, खडसे, लोणारे, मुन, करमरकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर