शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

जिल्ह्यातील पाच लाख सातबारांचे संगणीकरण

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र

चंद्रपूर : राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सातबारा संगणकीकृत देण्याचा पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोरपना तालुक्यात १५ जुलै पासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तलाठ्यांना देण्यासाठी लॅपटॉप उपलब्ध आहेत.भूमिअभिलेखाचे जतन करण्यासाठी अभिलेख स्कॅनिग कार्यक्रम राबविला जाणार असून पहिल्या टप्प्यात मूल, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, चंद्रपूर या तालुक्यातील अभिलेख स्कॅनिंग करण्यात येणार आहे. उर्वरीत तालुक्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. जिल्ह्यात १९ लाख ९५ हजार अभिलेखे असून या सर्वाचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. आता आॅनलाईन फेरफार मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व म्युटेशनचे कर्मचारी अशा एकूण २२४ डिजिटल स्वाक्षरी करुन संबंधितांना वितरीत करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर तालुक्यातील १०३ गावांमध्ये ३८५३८ साताबारा, बल्लारपूर ३५ गावात ८६०६, मूल १११ गावात ३५७४८, सावली ११८ गावात ४६१५३, पोंभुर्णा ७१ गावात १९३६५, गोंडपिपरी ९८ गावात २५१३९, वरोरा १८४ गावात ४२०००, भद्रावती १६४ गावात ३४७८५, चिमूर २६९ गावात ५२७९३, नागभीड १३८ गावात ४७०४६, सिंदेवाही ११५ गावात ४४०२६, ब्रह्मपुरी १४० गावात ५५३५३, राजुरा १११ गावात २९२२१, कोरपना ११३ गावात २०४१९ व जिवती ८३ गावात ११४५१ अशी एकूण १८३६ गावामध्यो ५ लाख १० हजार ६४३ सातबाराची संख्या आहे. सातबाराच्या आधुनिकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. हस्तलिखित सातबारा देणे बंद करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स सातबारा देण्यासाठी जिल्ह्यातील २८४ तलाठी व ३७ मंडळ अधिकाऱ्यांसाठी लॅपटॅप उलब्ध आहेत. यासोबतच डाटा कार्डही पूरविण्यात येणार आहे.जिल्ह्यात भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत इ- फेरफार या आज्ञानवलीची अंमलबजावणी करण्याचे काम प्रगतीपथावर असून १५ तालुक्यांमध्ये डाटा करेक्शन तसेच डाटा अपडेशनचे काम अंतिम टप्प्यात आहेत. कोरपना तालुक्यातील काम पूर्ण झाले असून सातबाराचे प्रिन्ट तलाठ्याकडून तपासले आहे. या ठिकाणी १५ जुलैपासूनच हस्तलिखित सातबारा देण्याचे काम बंद करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)