शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

४५० खासगी दवाखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 23:02 IST

देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, डेंटल क्लिनीकसह जवळपास ४५० खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णांची काहीसी हेळसांड झाली.

ठळक मुद्देडॉक्टरांचे आंदोलन : केंद्र सरकारच्या विधेयकाला विरोध
<p>लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, डेंटल क्लिनीकसह जवळपास ४५० खासगी दवाखाने बंद होते. त्यामुळे ग्रामीण भागातून उपचारासाठी आलेल्या रूग्णांची काहीसी हेळसांड झाली.केंद्र सरकारने मंजूर केलेला नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक गरिबांसाठी हानिकारक व असुविधाजनक आहे. यामुळे वैद्यकीय सेवा व वैद्यकीय शिक्षण अतिशय महाग व सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. हे विधेयक तत्काळ रद्द करावे, अशी मागणी करीत चंद्रपूर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) च्या सर्व पदाधिकारी, डॉक्टरांनी विधेयकाचा निषेध नोंदवत एक दिवसीय धिक्कार दिवस पाळला.काम बंद आंदोलनामुळे शनिवारी सकाळी ६ वाजतापासून तर सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व खाजगी क्लिनिक व दवाखाने बंद होते. मात्र तातडीच्या सेवा तसेच रुग्णालयातील दाखल रुग्णांच्या सेवा सुरू होत्या, असे इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत व सचिव डॉ. मंसूर चिनी यांनी सांगितले.आयएमए सभागृहात निषेध आंदोलनाला डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. प्रमोद ठाकूर, डॉ. किरण देशपांडे, डॉ. विजय करमरकर, डॉ. मनिष मुंधडा, डॉ. अनिल माडुरवार, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. शर्मिली पोद्दार, डॉ. नगिना नायडू, डॉ. मनिषा वासाडे आदींचा सहभाग होता.