शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

चंद्रपूर महानगर पालिकेकडून ४ हजार ९० अ‍ॅन्टिजेन चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी १५ जुलैपासुन सुरू करण्यात आलेल्या टेस्ंिटग सेंटरची दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोविड १९ चाचण्यांचा रिपोर्ट उपलब्ध होण्याचा कालावधीही आता कमी झाला आहे. अ‍ॅन्टिजेन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचा रिपोर्ट मिळतो. याद्वारे कोविड संशयित व्यक्तीला गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होत आहे.

ठळक मुद्देतात्काळ उपचार करणे शक्य : दररोज २०० चाचण्या करण्याची केंद्राची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा संसर्ग होवू नये व लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यासाठी महानगर पालिकेद्वारे जटपूरा वार्डातील सरदार वल्लभभाई पटेल शाळेत रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टींग केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रात दररोज १०० ते १५० चाचण्यात केल्या जात आहेत. मंगळवारपर्यंत तब्बल ४ हजार ९० चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे संशयित व्यक्तीला गाठून तात्काळ उपचार करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होत आहे.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी १५ जुलैपासुन सुरू करण्यात आलेल्या टेस्ंिटग सेंटरची दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोविड १९ चाचण्यांचा रिपोर्ट उपलब्ध होण्याचा कालावधीही आता कमी झाला आहे. अ‍ॅन्टिजेन टेस्टींग सेंटरच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर केवळ १५ ते ३० मिनिटात चाचणीचा रिपोर्ट मिळतो. याद्वारे कोविड संशयित व्यक्तीला गाठून त्याच्यावर वेळेत उपचार करणे शक्य होत आहे. सेंटरमध्ये करण्यात येणाऱ्या चाचण्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या निर्देशानुसारच होत आहेत. कोविड सदृश्य लक्षणे ताप, सर्दी, थकवा, खोकला असलेल्या व्यक्ती, कंटेनमेंट झोन किंवा हॉटस्पॉट क्षेत्रातील रूग्ण व रूग्णालयाच्या संशयित कक्षातील रूग्णांची तपासणी केली जात आहे. मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे यांच्या मार्गदर्शनात रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्टींग सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी आहे.सहाय्यक म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री वाडे, डॉ. सुवर्णा रामपेल्लीवार, विद्या चौधरी, स्नेहल शंभरकर, अनिता बंडेलवार, स्मिता उराडे, बालाजी जाधव, शुभम दिवसे, राकेश सोयाम व प्रलय पडगलेवार आदींचे पथक कार्यरत आहे.कोरोना रोखण्यासाठी त्रिसुत्रीचंद्रपुरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. हीच साखळी तोडण्यासाठी मनपाने ‘टार्गेट झिरो’ ही संकल्पना राबवत आहे. रूग्णाची ओळख, तातडीने अलगीकरण व तात्काळ उपचार करणे हे त्रिसूत्रीचे आहे. याकरीता अ‍ॅन्टिजेन चाचण्या तसेच रूग्णांसाठी बेड्सची संख्या वाढविण्यात आली. मनपातर्फे १५० बेड्स असलेले नवीन कोविड केअर सेंटर वन अकादमी येथे सुरू झाले. यापूर्वी वन अकादमी १ व २ येथे असणारे कोविड केअर सेंटर आता इमारत क्रमांक ३ मध्येही सुरू करण्यात आल्याने अधिकाधिक रूग्णांचे उपचार करणे शक्य झाले. यासोबतच कंटेनमेंट झोनमधील कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची गती वाढविण्यात आली आहे.कोरोना प्रतिबंधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रूग्ण वाढण्याचा कालावधी व मृत्यूचा दर कमी होण्यास मदत होईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांद्वारे दररोज आढावा घेतला जात आहे. ‘टार्गेट झिरो’ या संकल्पनेमुळे चंद्रपुरातील कोरोना रूग्णांच्या संख्येत निश्चितपणे घट होवू शकेल.- डॉ. आविष्कार खंडारे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा, चंद्रपूरव्यावसायिकांचीही होणार तपासणीनागरिकांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. संकटकाळात व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवून नागरिकांना सेवा देण्याचे काम करत आहेत. अशा स्थिती कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेवून व्यावसायिकांची चाचणी करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी गुल्हाणे यांच्याकडे केली होती. त्यामुळे इच्छुक व्यापाऱ्यांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट केल्या जाणार आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या