शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
7
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
8
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
9
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
10
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
11
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
12
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
13
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
14
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
15
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
16
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
17
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
19
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
20
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...

४ कोटींचा खर्च; तरीही विद्यार्थिनींचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या.

एसटी महामंडळाचा कारभार : विद्यार्थिनींच्या बसमध्ये अन्य प्रवाशांची वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांमधून विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच अधिक वाहतूक केली जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हाभरात ७७ बसगाड्या आरक्षीत असून विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला डिझेल खर्च म्हणून एका बसमागे वार्षिक ६ लाख रूपये असे ४ कोटी ४२ लाख रूपये दरवर्षी दिले जात आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या मुजोरीने विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच जास्त वाहतूक होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे बसमध्ये उभ्याने प्रवास करणारी विद्यार्थिनी दारावर उभी असताना धावत्या बसमधून खाली पडल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मानव विकास मिशनच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींनाच बसण्यासाठी सीट मिळत नाही, असे बरेचदा घडते. बसमध्ये विद्यार्थिनींना प्रथम स्थान देण्यात आले असले तरी अनेक प्रवासी विद्यार्थिनींना बसण्यासाठी जागा देत नाही. त्यामुळे सावित्रीच्या लेकींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या बसगाड्यांद्वारे शालेय वेळात फक्त विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. शालेय वेळात येणार बसगाडी ही इतर प्रवाशांनी गच्च भरून असते. अशावेळी एकच बसगाडी असल्यास विद्यार्थिनी त्याच बसने उभ्याने प्रवास करतात. बसचा वाहकही विद्यार्थिनींना सीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न न करता दमदाटी करताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थिनींच्या अडचणी वाढल्या असून याकडे वेळीच लक्ष देऊन केवळ विद्यार्थ्यांसाठी बसगाडी सोडण्याची मागणी पालकांकडून होत आहे. नियम डावलून जिल्हाअंतर्गत वाहतूक शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या एका बसने दिवसभरात कमीत कमी १२० विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवशक्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तसेच मानव विकास मिशनच्या बसने शाळेला सुट्टी असण्याच्या दिवशी वगळून इतर दिवशी जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक करू नये, असे म्हटले आहे. मात्र या बसगाड्यांद्वारे सर्रासपणे जिल्हातंर्गत वाहतूक केली जाते. याबाबत वारंवार नोटीस पाठवूनही एसटी महामंडळ दखल घेत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २५३ शाळांच्या सहा हजार विद्यार्थिनीमानव विकास मिशन अंतर्गत यावर्षी पासचे वाटप सुरू असून अद्याप आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार १९९ विद्यार्थिनींनी या योजनेतून शालेय प्रवास केला. मानव विकास मिशन योजनेत पंधरा तालुक्यातील ६१८ गावांचा समावेश असून २५३ बसफेरीत समाविष्ठ शाळा आहेत. बसगाडी केवळ विद्यार्थिनींसाठी असली तरी बसमध्ये चढलेल्या इतर प्रवाशाला उतरविण्याची हिमंत चालक व वाहक करू शकत नाही. अनेक गावांमध्ये एकच बसफेरी असते. एसटी महामंडळाकडे कर्मचारी, चालक व वाहकांची कमतरता आहे. केवळ विद्यार्थिनींसाठी बसफेऱ्या सुरू करण्यास अडचणी आहेत. मानव विकासच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गांगलवाडी घटनेची चौकशी सुरू आहे. - निलेश बेलसरे विभागीय वाहतूक अधिकारी, चंद्रपूर