बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांना बुधवारी सकाळच्या दरम्यान बस स्टँड परिसरात ट्रकद्वारे अवैध दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे नाकेबंदी करून १८ लाख ६० हजार रुपयांची देशी दारू व २० लाखांचा टाटा ट्रक असा एकूण ३८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रझिम मुलानी व विकास गायकवाड, पोहवा सुनील कामटकर, पोना मनोज पिदूरकर, पोशी दिलीप आदे यांनी केली. या कारवाईत १२ हजार ४०० देशी दारूच्या बाटल्या अंदाजे किंमत १८ लाख ६० हजार व टाटा ट्रक अंदाजे किंमत २० लाख असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी आरोपी प्रशांत भानुदास दाराला, शेख अशपाक शेख अजीम, प्रदीप दारला व करण निषाद सर्व रा. भगतसिंग वॉर्ड यांच्याविरुध्द पो. अप क्र. ५१२/२०२१ मदाका कलम (अ) ८३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.