शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

३४ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

ठळक मुद्दे१८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : दिवसागणिक वाढू लागला संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर बुधवारी पुन्हा ३४ बाधितांची भर पडली. १८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिवसागणिक संसर्गाचा वेग वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ३४ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १०, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर एक, भद्रावती नऊ, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर व वरोरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  कोरानाचे रुग्णात आता दुपटीने वाढ होणे सुरू झाले आहे. तरीही अनेकजण याबाबत याबाबत गंभीर दिसत नसल्याचे चित्र आहे.

मास्क न वापरणाऱ्यांकडून दहा लाखांचा दंड वसूल जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, शारीरिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नागरिकांवर प्रशासनाने कारवाई सुरू आहे. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ तीन दिवसात  एक हजार ३३७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियम न पाळणाऱ्या २० आस्थापनांवर ३९ हजारांचा दंड ठोठावला तर मास्क न वापरल्याने ४ हजार ६२५ जणांकडून ९ लाख ८६ हजार ५४० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिली.

भद्रावतीत नऊ व्यावसायिकांकडून वसूल केला दंड भद्रावती : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टप्पा परिसरात नगरपरिषदेच्या भरारी पथकाने नऊ दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिक व दुकानदार शहरात बिनधास्तपणे वावरत असल्याने नगरपालिकेच्या भरारी पथकाने आपली धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. टप्पा परिसरात असलेल्या दुकानदाराकडे नागरिकांची गर्दी असल्याचे आढळून आल्याने व विना मास्क असलेल्या दुकानदारांवर प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसुली करून त्यांना ग्राहकांची गर्दी करण्यात येऊ नये व विना मास्क कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नये, अशी ताकीद दिली. ही कारवाई मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, रवींद्र गड्डमवार, जगदीश गायकवाड व भरारी पथकाच्या सदस्यांनी केली.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या