शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला ३० लाखांचा दंड

By admin | Updated: June 6, 2017 00:38 IST

गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही.

गडचांदूर येथील योजना : चार वर्षांपासून जलशुद्धीकरणाचे काम रेंगाळलेलोकमत न्यूज नेटवर्कवनसडी : गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवानी लागत आहे. याची दखल घेत चार वर्षे लोटूनही काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.गडचांदूर शहराला सिमेंटनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. याची दखल घेत येथे फिल्टर प्लांट आणि पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे हे काम सोपविण्यात आले. जीव प्राधिकरणाने निविदा प्रकाशित केली. कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आले. मागील चार वर्षापासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र, मुदतीत काम झाले नाही. त्यामुळेच आता कंत्राटदारावर दररोज चार हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत ३० लाखांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आल्याचे जीवन प्राधीकरण विभागाकडून सांगण्यात आले. या कामाबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दोन महिन्यातच काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीही हेच उत्तर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले होते. वास्तविक, फिल्टर प्लांट, टाकी आणि पाइप फिटींगची अनेक कामे व्हायची आहेत. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती.