शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय योजनांपासून वंचित २७ हजार ५२० असंघटित कामगारांना मिळणार रेशनकार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 13:03 IST

पुरवठा विभागाचा पुढाकार : कामगारांना रेशनकार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गरीब, गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर रेशनकार्ड महत्त्वाचे मानले जाते. मात्र आजही अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे अशा नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागते. दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल २७ हजार ५२० असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांकडे रेशनकार्ड नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता या कामगारांना पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्ड वितरण केले जाणार आहे. 

स्थलांतरित तसेच असंघटित कामगारांना रेशनकार्ड वितरण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहे. त्यानंतर नियमानुसार पडताळणी, तपासणी करून स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वितरित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. यासाठी अन्न नागरिक व ग्राहक संरक्षण विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कामगार विभागाकडून पुरवठा विभागाला तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे. यानुसार रेशनकार्ड तयार करून दिले जात असल्याचे अन्न धान्य वितरण अधिकारी सुमेर चवरे यांनी सांगितले.

काय लागणार कागदपत्र कुटुंबातील सर्वांचे आधारकार्ड, बैंक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, गॅस पासबुक.

कर्मचाऱ्यांची तत्परता जिल्ह्यातील २७ हजार ५२० असंघटित कामगारांना रेशनकार्ड देण्यासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे. विभागाकडून आलेल्या नावानुसार संबंधित काम- गारांपर्यंत पोहचून त्यांना रेशनकार्ड काढण्यासंदर्भात सांगितल्या जात आहे. संपूर्ण कागदपत्र घेऊन येणाऱ्या कामगारांना तत्काळ रेशनकार्ड काढून दिले जात आहे.

कामगारांना दिलासा मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात असंघटित कामगार काम करीत आहेत. मात्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांसह धान्यापासूनही वंचित रहावे लागत होते. यासंदर्भात न्यायालयाने स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार आता या कामगारांना रेशनकार्ड दिले जात असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

कार्यालयात बोलावून रेशनकार्डचे वितरण जिल्ह्यातील बहुतांश असंघटित कामगारांकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे कामगार विभागाकडून आलेल्या यादीनुसार पुरवठा विभाग संबंधित कामगारांसोबत संपर्क साधून त्यांना कार्यालयातून बोलावून रेशनकार्डचे वितरित करीत आहे.

"असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांना रेशनकार्ड तयार करून दिले जात आहे. आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात जाऊन रेशनकार्ड काढून घ्यावे. यासाठी विशेष मोहीम राबविणे सुरू करण्यात आले आहे."- राहुल बहादूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर