शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २५० वाघ; नैसर्गिक अधिवास आला धोक्यात

By साईनाथ कुचनकार | Updated: July 29, 2024 16:38 IST

Chandrapur : २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. आज घडीला चंद्रपूर जिल्ह्यात २५० च्या वर वाघांचे वास्तव आहे. ताडोबामध्ये हमखास वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची मोठी पसंती असते. मात्र जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वाघांना अधिवास कमी पडत आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे ही बाब भविष्यासाठी मानव आणि वाघांनाही धोकादायक ठरू शकते. मागील काही वर्षांमध्ये मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी केली जात आहे. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वाघांच्या घरांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.

असे आहे वाघांचे वास्तवजिल्ह्यात आजमितीस २५० च्या घरात वाघ आहेत. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर-बफर क्षेत्रात जवळपास १० अधिक वाघ आहेत. ब्रह्मपुरी एकट्या प्रादेशिक वनक्षेत्रात ७० ते ८० वाघ आहे. त्याशिवाय मध्य चांदा वनविभाग क्षेत्रात १५- २० आणि चंद्रपूर वनविभाग अंतर्गत वनक्षेत्रात २०ते २५ वाघ आहे. याशिवाय कन्हारगाव अभयारण्यामध्ये १० ते १२ वाघ, तर घोडाझरी अभयारण्यमध्येसुद्धा अनेक वाघ आहेत. एफडीसीएमच्या वनक्षेत्रात १० ते १५ वाधाची संख्या आहे.

हमखास वाघांचे दर्शनचंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना एक नजर बघण्यासाठी देशातीलच नाहीं तर विदेशातीलही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथे हमखास वाघाचे दर्शन होते.

वाघ आपले अधिवास बदलतोय"वाढत्या वाघांच्या संख्येसोबत त्यांना आवश्यक अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे वाघाचा आपसातील संघर्ष वाढू लागला आहे. वाघांकडूनसुद्धा नवा अधिवास स्वीकारला जात आहे. यात विविध कारखान्याचे औद्योगिक क्षेत्र जसे सीटीपीएस, वेकोलिचे क्षेत्र आणि नदीपात्रांतील झाडेझुटूप असलेले क्षेत्रसुद्धा स्वीकारले जात आहे."- बंडू धोतरे वन्यजीव अभ्यासक, चंद्रपूर

मानव - वन्यजीव संघर्ष वाढला चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज वाघ-मानव संघर्षाच्या घटना घडत आहे. व्याघ्र जिल्हा म्हणून नावारूपास येताना वाढलेले वाघ आता वाघ - मानव संघर्षाच्या रूपाने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी ताडोबाचे जंगल आणि काही ठराविक जंगलात असलेले वाद्यांचा आज जिल्ह्यात सर्वत्र सर्वदूर असलेल्या वनक्षेत्रात वावर दिसून येतात. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवTigerवाघchandrapur-acचंद्रपूर