शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कारागृहासाठी २४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:18 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : बंदीवानांसाठी बॅरेक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे जिल्हा कारागृह परिसरात अतिरिक्त ५०० बंदीवान राहतील, अशा पध्दतीच्या बॅरेकचे बांधकाम व इतर पुरक बांधकामासाठी १४ कोटी २२ लाख ७५ हजार रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा कारागृहाच्या आस्थापनेवर एकूण ८१ पदे मंजूर असून अधिकारी व कर्मचारी यांच्या वास्तव्याकरिता सद्यस्थितीत २२ निवासस्थाने उपलब्ध आहेत. त्यापैकी १२ निवासस्थाने वास्तव्यास योग्य आहे. १० निवासस्थाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्लेखित करण्यात आलेली आहे. सदर कारागृहातील निर्लेखित करण्यात आलेल्या निवासस्थानसह इतर निवासस्थाने बांधण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार टाईप २ ची ३६ व टाईप ३ ची चार निवासस्थाने बांधण्यासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.जिल्हा कारागृहात बंदी बांधवांना राहण्याच्या दृष्टीने होत असलेली अडचण लक्षात घेता पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ५०० अतिरीक्त बंदीवान राहतील, अशा पध्दतीचे बॅरेक व इतर पूरक बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बांधकामासाठी १४ कोटी २२ लाख ७५ हजार रू. मंजूर केले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार