शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

२२८२ पोलिओ लसीकरण केंद्र

By admin | Updated: January 13, 2017 00:27 IST

जिल्ह्यात पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी २९ जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे.

२९ जानेवारीला मोहीम : १२५ मोबाईल पथकांची व्यवस्था चंद्रपूर : जिल्ह्यात पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी २९ जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी घेण्यात आली.यावर्षीची पहिली फेरी २९ जानेवारी रोजी राबविण्यात येणार असून त्यानंतर ग्रामीण भागात ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी असे पाच दिवस तर शहरी व महानगरपालिका भागात पाच दिवस घरोघरी जावून लस पाजण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक या प्रमाणे १९८३, शहरी भागात १६५ व महानगरपालिका क्षेत्रात १३४ असे एकूण २२८२ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी, यासाठी ग्रामीण भागात ९६, शहरी भागात ११ व महानगरपालिका क्षेत्रात १८ अशा एकूण १२५ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.टोल नाका, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुध्दा ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रात १७८ ट्राझिंट टीमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केली आहे. आयपीआय मोहिमेमध्ये घरोघरी जावून लस पाजण्याकरिता १०८८ ग्रामीण, १३४ शहरी व १८४ महानगरपालिका क्षेत्र अशा एकूण १४०६ पथकांची व्यवस्था केलेली आहे. या मोहिमेकरिता ग्रामीण भागात ४४८९, शहरी भागात ४६३ व महानगरपालिका क्षेत्रा ४०० असे एकूण ५३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ग्रामीण भागाकरीता ३९७ व शहरी भागाकरीता ३३ तर महानगरपालिका क्षेत्राकरिता २७ असे एकूण ४५७ पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे. पल्स पोलिओ मोहिमेमध्ये रोटरी क्लब व जेसीस सारख्या सेवाभावी संस्थांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला असून सेवाभावी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.(प्रतिनिधी)