शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

२२४ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 22:48 IST

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्टफोन देण्यात आले. तालुक्यातील २२४ अंगणवाड्यांमध्ये ही प्रणाली अचुकपणे वापरल्या जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे कामकाज ‘स्मार्ट’च्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देवेळेची बचत : कॅश अप्लिकेशनद्वारे भरत आहेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे आयसीडीएस प्रणाली अंतर्गत राष्ट्रीय पोषण मिशनच्या माध्यमातून आयसीडीसी-कॅश (कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेअर) विकसित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा परिषद व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्टफोन देण्यात आले. तालुक्यातील २२४ अंगणवाड्यांमध्ये ही प्रणाली अचुकपणे वापरल्या जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या मार्गदर्शनामुळे कामकाज ‘स्मार्ट’च्या मार्गावर आहे.तालुक्यात २२४ अंगणवाडी केंद्र आहेत. सर्व अंगणवाडी सेविकांना इंटरनेट सेवेसह स्मार्ट फोन देण्यात आले आहे. शिवाय दर तीन महिन्याकरिता नेट रिचार्जसाठी प्रत्येक अंगणवाडी सेविकेला ४०० रूपये दिल्या जाते. चार टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी डॉ. कुणाल धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांना मोबाईल प्रशिक्षण देत आहेत. मोबाईलमधील कॅश अप्लिकेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बालकांच्या दैनंदिन नोंदी,लसीकरण, गृहभेटी, स्तनदा माता, गरोदर माता व किशोरी मुलींच्या आरोग्याच्या नोंदी, पोषण आहाराचे वाटप, दैनंदिन अहवाल, उंचीच्या नोंदी व अहवाल तयार केले जात आहे. अंगणवाडी केंद्राच्या प्रत्येक लाभार्थ्यांची आॅनलाईन नोंद करणे, रियल टाइम डेटाचा उपयोग करताना रिपोर्ट व डॅशबोर्ड प्रदान करणे, आदी कामे आॅनलाईन केली जात आहेत.११ रजिस्टर झाले कालबाह्ययाआधी अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या ११ रजिस्टरमध्ये माहिती लिहून प्रकल्प स्तरावर सादर करावे लागत होते. सदर काम वेळखाऊ व जिकरीचे होते. आता मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधा वाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल कॅश अप्लिकेशनद्वारे आॅनलाईन भरल्या जात आहे, अशी माहिती अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा मेश्राम यांनी दिली.