ब्रह्मपुरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशान्वये तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशान्वये दिवाणी व फौजदारी न्यायालय, ब्रह्मपुरी येथे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालत पार पडली.
यामध्ये मोटार वाहन कायदा अंतर्गत ५, मुंबई पोलीस कायदा अंतर्गत १ तसेच भारतीय दंड संहिता अंतर्गत २६ असे एकूण ३२ प्रकरणात १० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच न्यायालयात दाखल पूर्व अशा एकूण १० प्रकरणातून २१ लाख ९५ हजार ४२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एका दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणातून ५६ हजार रुपये वसुल करण्यात आले. अशा एकूण १५ प्रकरणांचा लोक अदालतीमध्ये समझोता करण्यात आला.
यावेळी लोक अदालतचे पॅनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश मा. गो. मोरे, ब्रह्मपुरी पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता अंकिता गिरडकर, अधिवक्ता आशिष गोंडाने उपस्थित होते. यावेळी तडजोडीअंतर्गत निकाली निघालेल्या पक्षकारांना न्यायाधीश मा. गो. मोरे यांच्या वतीने फळझाडे भेट देण्यात आली. लोकअदालतला यशस्वी करण्यासाठी तालुका विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ अधिवक्ता मनोहर उरकुडे, अधिवक्ता हेमंत उरकुडे, अधिवक्ता चंद्रकांत निमजे, अधिवक्ता रविंद्र चौधरी, अधिवक्ता गणेश राऊत, अधिवक्ता विजय नाकतोडे, अधिवक्ता शरयु देवीकर, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक बी. यु. कपाटे, न्यायालयीन कर्मचारी संघप्रिया रामटेके, एच. जी. खोब्रागडे, उमेश दहीहांडेकर, साबेर काझी, प्रशांत वालदे, पंकज कोल्हे, अंकुश मावस्कर, आशिष रामटेके, अजय जिभकाटे, नरेश पेंदोर, प्रियंका डोंगरे आदींनी सहकार्य केले.