शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या १५७१ जागांसाठी २१५० अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

चंद्रपूर : बालकांना मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी ...

चंद्रपूर : बालकांना मोफत तसेच सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात आरटीईच्या १५७१ जागांसाठी बुधवारपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याचे २१५० ऑनलाईन अर्ज भरले आहेत. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी आणखी चार दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे यावर्षीही प्रवेशासाठी पालकांना वाटच बघावी लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी १९६ शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेकरिता २५ टक्क्यानुसार १५७१ जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ३ मार्चपासून पालकांनी अर्ज भरणे सुरू केले असून, बुधवारपर्यंत २१५० पालकांनी अर्ज सादर केले आहेत. विशेष म्हणजे, अर्ज भरण्यासाठी आणखी चार दिवसाचा कालावधी आहे. त्यामुळे या अर्जामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शहरातील पालकांनी अधिक प्रमाणात अर्ज दाखल केले आहेत.

बाॅक्स

१९६ शाळा २१५० जागा

आरटीईअंतर्गत जिल्ह्यात १९६ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये या वर्षासाठी १५७१ रिक्त जागा आहेत. यासाठी पालकांनी अर्ज भरले आहेत. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अर्ज भरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

बाॅक्स

नामांकित शाळांनी नर्सरीचा प्रवेश टाळला

चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात नामांकित खासगी इंग्रजी शाळा आहेत. मात्र यातील काही शाळांनी नर्सरीसाठी प्रवेश टाळल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, जेटपुरा गेट, रामनगर, दाताळा रोड, चोरखिडकी आदी परिसरात केवळ एका शाळेनेच आरटीईअंतर्गत नर्सरीसाठी प्रवेश सुरू ठेवला आहे. अन्य शाळांनी मात्र नर्सरीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे टाळल्याने परिसरातील गोरगरीब पालकांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये खर्च करून नर्सरीसाठी आपल्या पाल्यांचा प्रवेश घ्यावा लागणार आहे.