शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

आणखी २०० बँका दिवाळखोरीच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2022 22:48 IST

बाबाजी दाते महिला बँकेप्रमाणेच देशातील सुमारे दोनशेहून अधिक सहकारी बँका दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. नव्या कायद्यानुसार खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत. सध्या देशात १४८२ सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी राज्यातील बँकांची बॅलन्स शीट तपासली जाते. त्यावरून बँकेची आर्थिक स्थिती पुढे येते. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेचे लायसेन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले असून, या बँकेमध्ये पाच जिल्ह्यांतील १९ शाखांमधील ३६ हजार ग्राहकांचे पैसे अडकले आहेत. यातील पाच लाखांपर्यंत ठेवी अडकलेल्या खातेदारांना पैसे परत देण्यात येत असले तरी पाच लाखांवरील पैशांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, बाबाजी दाते महिला बँकेप्रमाणेच देशातील सुमारे दोनशेहून अधिक सहकारी बँका दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.नव्या कायद्यानुसार खासगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकाही आता रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आहेत. सध्या देशात १४८२ सहकारी बँका आणि ५८ मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने दरवर्षी राज्यातील बँकांची बॅलन्स शीट तपासली जाते. त्यावरून बँकेची आर्थिक स्थिती पुढे येते. मागील काही वर्षांमध्ये सहकारी बँकांच्या थकीत, तसेच बुडीत कर्जांमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. अशाच सुमारे ५० बँका सेक्शन ३५-ए मध्ये आल्या होत्या. त्यांतील २० पेक्षा अधिक बँकांचे लायसेन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केल्याने या बँकांतील           लाखो ठेवीदार अडचणीत आलेले आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सहकारीसह सर्व प्रकारच्या बँकांनी डीआयसीजीसी (डिपॉझिट इन्शुरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन)द्वारे विमा उतरविणे आवश्यक आहे. कायद्यानुसार काॅर्पोरेशन विमा उतरविलेल्या बँकेच्या ठेवीदारांना विम्याची ठेव रक्कम देण्यास डीआयसीजीसी जबाबदार आहे. डीआयसीजीसीकडून अंतरिम पेमेंट फ्रिझच्या ९० दिवसांच्या आत प्राप्त होते. यामध्ये विमाधारकाला थकीत ठेवीचे तपशील बँकेकडे ४५ दिवसांत द्यावे लागतात. या दाव्यांची सत्यता पडताळण्यासाठी महामंडळ ३० दिवस घेते आणि त्यानंतर १५ दिवसांत हे पेमेंट ठेवीदारापर्यंत पोहोचविणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ पाच लाखांपर्यंतच्या ठेव रकमेचाच विमा काढला जात असल्याने त्यापेक्षा अधिक रक्कम अडकलेल्या खातेदारांचे आणि त्यांच्या कोट्यवधी रुपयांचे काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ठेवीदारांनी सावधगिरी बाळगण्याची गरजया नव्या कायद्यानुसार जानेवारी २०२२ पर्यंत १.२ लाख ठेवीदारांना त्यांच्या दाव्यांच्या विरोधात दीड हजार कोटीहून अधिक रक्कम डीआयसीजीसीकडून अदा केली आहे. मात्र, लाखो खातेदार असे आहेत, ज्यांची पाच लाखांपेक्षा अधिकची रक्कम बुडीत बँकांमध्ये अडकली आहे. ही रक्कम मिळण्यासाठी यापुढील काळात लढा लढावा लागेल असेही डिपॉझिटर्स प्रोटेक्शन ॲन्ड वेल्फेअर सोसायटीचे सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी सांगितले.

बँक ठेवीदार संघटनेने मे २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर ऑगस्ट २०२० मध्ये उच्च न्यायालयाचे न्या. काथावाला यांनी निर्णय देत पाच लाखांपर्यंतची रक्कम लिक्विडेशनआधीच खातेदारांना देण्यास डीआयसीजीसीला भाग पाडले. या निर्णयामुळे लिक्विडेशनपूर्वी ९० दिवसांत पाच लाखांपर्यंतची रक्कम देण्याचा संसदेत कायदा करण्यात आला. मात्र, पाच लाखांवरील रकमेचे काय? असा आमचा प्रश्न आहे. - विश्वास उटगी, सेक्रेटरी बँक डिपॉझिटर्स प्रोटेक्शन अँड वेल्फेअर सोसायटी 

 

टॅग्स :bankबँक